Now Reading:
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ५ जालीम तोडगे! धरा आनंदी जीवनाची कास
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी ५ जालीम तोडगे! धरा आनंदी जीवनाची कास

नैराश्य हे कोणाला चुकलंय? ज्याला स्वप्नं आहेत, महत्वाकांक्षा आहेत, इच्छा अपेक्षा आहेत त्या प्रत्येकाला कधी ना कधी नैराश्याचा सामना करावाच लागलाय. पण काहींना या चक्रव्यूहातून बाहेर पडता येतं तर काही तसेच गुरफटून राहतात. पण आम्हाला खात्री आहे खालील गोष्टी केल्यास तुमचा चिंतेचा भार लाखपटीने हलका होईल.

नैराश्य ही समस्या आहे हे समजून घ्या-

कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी प्रथम ती समस्या समजून घेणे आवश्यक आहे. एकदा शत्रू कोण आहे ते कळलं की त्यावर मात करणं सोपं जातं. म्हणून समस्यांची एक यादी करा आणि मग त्यांतून कसं बाहेर पडायचं यावर सकारात्मक विचार करा.

विचारशक्तीला समस्यांवर मात करण्यास आवाहन करा-

आपला मेंदू ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. आपण नुसत्या विचारांच्या जोरावर जग जिंकू शकतो. आपल्या विचारशक्तीला आपल्या समस्यांवर मात करण्यास प्रोत्साहन द्या.

स्वतःला व्यस्त ठेवा-

नैराश्याच्या प्रमुख कारणांपैकी आहे आपली सतत गरजेपेक्षा जास्त विचार करण्याची प्रवृत्ती. म्हणून आपण स्वतःला जितकं जास्त व्यस्त ठेवू तितके नकारात्मक विचार आपल्या मनात येणार नाही.

व्यायाम करा-

नैराश्य कमी करण्यासाठी विशिष्ट असा काही व्यायामप्रकार नाहीये. पण स्वतःला जितकं जास्त शारीरिक उपक्रमांत अडकवाल तितकं तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

सकस जीवनशैली पाळा-

हे वाटतं तितकं कठीण नाही. फक्त वेळेवर जेवण व वेळेवर झोपलात तरीही तुम्ही एक सकस जीवनशैली जपू शकता.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.