Now Reading:
भारतीय शृंगारामागची ५ वैज्ञानिक कारणे ज्यामुळे तुम्हाला हमखास नटायची इच्छा होईल
भारतीय शृंगारामागची ५ वैज्ञानिक कारणे ज्यामुळे तुम्हाला हमखास नटायची इच्छा होईल

भारतातील परंपरांनुसार विवाहित महिलेला सौभाग्याचं लेणं असणाऱ्या काही गोष्टी घालाव्या लागतात. केवळ पिढ्यांन् पिढ्या सुरु असलेली परंपरा म्हणून नाही तर या सौभाग्याचं लेणं असलेल्या वस्तूंचे तर्कशुद्ध व शास्त्रीय महत्त्वदेखील आहे. काय आहेत त्यामागची शास्त्रीय कारणे पाहुयात.

१. कुंकू किंवा टिकली –

कुंकू किंवा टिकली कपाळावर लावल्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. टिकली किंवा कुंकू डोक्याच्या केंद्रस्थानी दोन भुवयांच्या मध्यभागी लावले जाते. तो आपल्या मेंदूचा मध्य असतो. आपल्या विचारांमध्ये शांतता यावी आणि ते एका केंद्रस्थानी असावे यासाठी कुंकू किंवा टिकली लावली जाते.

२. साखरपुड्याची अंगठी –

साखरपुड्यात जोडीदाराकडून घातली जाणारी अंगठी मुलींच्या डाव्या हातातील अनामिकेमध्ये घातली जाते तर मुलांच्या उजव्या हातातील अनामिकेत घातली जातेय, कारण अनामिकेच्या रक्तवाहिन्या हृदयाशी जोडलेल्या असतात. आपला जोडीदार कायम आपल्याशी जोडला जावा यासाठी या बोटामध्ये अंगठी घालतात. 

३. मंगळसूत्र –

Image Source

मंगळसूत्र केवळ लग्नाचे ‘लायसन्स’ नसून ते सौभाग्याचं प्रमुख लेणं मानलं जातं. शास्त्रानुसार सोनं शरीराजवळ राहिल्यास त्यातून एक सकारात्मक उर्जा प्राप्त होत असते.

४. हिरव्या बांगड्या –

प्रत्येक मुलीच्या हातात लग्नावेळी हिरवा चुडा भरला जातो. शास्त्रानुसार हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरातील सुख शांतीचा अंदाज वर्तवला जातो.

५. जोडवे –

लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीच्या पायाच्या मधल्या बोटात चांदीची जोडवी घातली जातात. चांदी जमिनीतील ऊर्जा शरीरात पोहचण्याचे काम करते. तसेच जोडवी ही गर्भाशय निरोगी राहण्यासाठी घातली जातात. तसेच गर्भधारणेत त्रास होत नाही.

Input your search keywords and press Enter.