Now Reading:
बैलगाडीसाठी ‘ब्रेक सिस्टीम’चा शोध लावणारा बेळगावचा अवलिया!
बैलगाडीसाठी ‘ब्रेक सिस्टीम’चा शोध लावणारा बेळगावचा अवलिया!

जीवनात अडचणी या सगळ्यांच्याच पदरी असतात. काहीजण कळत नकळत त्यांमध्येच अधिक खोल अडकून जातात. पण काही अशा बिकट परीस्थितीवर मात करत अटकेपार झेंडा फडकवितात. अशावेळी वाटेत येणारे हे सारे अडथळे एखाद्यास खूप काही शिकवून जातात. अशाच अनामी वीरांपैकी एक म्हणजे संतोष कावेरी, राहणार बेळगाव कर्नाटक.

शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या संतोषने गावातील समस्या बालपणापासून पाहिल्या होत्या. दहा किलोमीटरचा शाळेचा पट्टा पार करीत असताना, कमी वयातच तो शेतीच्या कामात जुंपला. हे सर्व सांभाळत त्याने कॉलेज शिक्षण ही पूर्ण केले. एक क्रियाशील उद्योजक बनण्याच्या ध्येयाने संतोषने बेळगाव येथील ‘देशपांडे फाउन्डेशन’सोबत काम करण्यास सुरुवात केली. येथे त्याच्या कल्पनांना एक विशेष आकार मिळाला. यापैकीच एक कल्पना म्हणजे बैलगाडीची (break system) ब्रेक सिस्टीम!

जुन्या पद्धतीप्रमाणे बैलाच्या गळ्यात, नाकात वेसन गुंपलेली असते, आणि ही वेसनाची दोरी चालक हातात पकडून गाडीचे नियंत्रण करत असतो. यात बैल आणि चालक दोघांनाही फार त्रास होतो. यावर उपाय म्हणून संतोषने बैलगाडीची ब्रेकलायनर यंत्रणा विकसित केली. ही यंत्रणा मोटरबाईकप्रमाणेच काम करते. ब्रेकपट्टीला लावलेल्या दोरीच्या सहाय्याने चालक बैलगाडीला ब्रेक देऊ शकतो. अशाच अनेक नव-नवीन संशोधनासाठी संतोषला रतन टाटा यांच्या हस्ते बेस्ट लीडरचा पुरस्कार ही देण्यात आला.

Cover Image Source: Wikimedia Commons, YouTube

Input your search keywords and press Enter.