Now Reading:
जळगावचा संदेश, डॉक्टरी सोडून शेतीतून कमावतोय लाखो रुपये!
जळगावचा संदेश, डॉक्टरी सोडून शेतीतून कमावतोय लाखो रुपये!

केशर हे बहुधा थंड प्रदेशात वाढणारे पिक! असे असून सुद्धा महाराष्ट्रातील जळगावसारख्या उष्ण प्रदेशात हे पिक वाढवून लाखोंची कमाई करण्याची ही कामगिरी संदेश पाटील यांनी करून दाखविली आहे. २७ वर्षीय संदेश जळगावमधील मोरगाव खुर्दचे रहिवासी असून आयुर्वेद विभागाच्या बी.ए.एम.एस.मध्ये शिक्षण घेत होते. मेडिकल अभ्यासात मन लागत नसल्याने त्यांनी डिग्री सोडली, आणि आपल्या गावी केशर पिकाची लागवड आधुनिक पद्धतीने करण्याची योजना आखली. गावातील पारंपरिक शेतीमधील अभावांचा अभ्यास केला.

विशेष जाणकारांच्या मदतीने जमिनीची सुपीकता वाढवण्याची तयारी केली. इंटरनेटवरून राजस्थान आणि इतर ठिकाणी होणाऱ्या केशर लागवडीचा सखोल अभ्यास करत, त्यांनी राजस्थानच्या पाली शहरातून ४० रुपयांना एक अशी तीन हजार केशरची रोपे खरेदी केली. आपल्या एक एकराच्या शेतात त्यांनी या सर्व रोपांची लागवड केली. जैविक खताचा वापर करून संदेश यांच्या एकरात मे २०१६ मध्ये जवळपास १६ किलो एवढी केशर निर्मिती केली. 

४० हजार किलोच्या हिशोबाने त्यांनी पहिल्या साडे पाच महिन्यातच एकूण ६.२० लाख एवढी मोठी कमाई केली. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा संतोष यांनी हार न मानता केशर लागवडीची ही नवीन कल्पना शक्य करून दाखविली. संतोष यांच्या प्रेरणेतून जिल्यातील केन्हाला, रावेर, निभोंरा, अमलनेर, अंतुर्की या ठिकाणी ही शेतकऱ्यांनी केशर लागवडीचा निर्णय घेतलेला आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.