Now Reading:
ब्रश करण्यापूर्वी टुथब्रश धुताय, थांबा आधी हे वाचा..
ब्रश करण्यापूर्वी टुथब्रश धुताय, थांबा आधी हे वाचा..

माणसांमध्ये विलक्षण सवयींची कमी नाही. काहीजण ब्रश करण्यापूर्वी टूथब्रश धुतात तर काही तसे न करताच तो वापरतात आणि काहीजण ब्रश केल्यानंतर तो धुतात. तुम्हाला कदाचित यापेक्षाही वेगळ्या सवयी असू शकतात.

हे सर्व वाचताना तुम्हाला कदाचित विचित्र वाटू शकतं. पण, सोशल मीडियावर याच विषयावर सध्या चर्चा रंगत असल्याचे दिसते. ट्विटरवर याबद्दल जणू काही युद्धच सुरु आहे. ब्रश आधी धुवून मगच टूथपेस्ट लावली पाहिजे असा विचार करणारा एक गट तर त्याविरुद्ध टूथपेस्ट लावल्यावर ब्रश धुतला पाहिजे असा विचार करणाऱ्यांचा दुसरा गट तयार झाला आहे.

असं म्हणतात, काही वादांना अंत नसतो. त्यामुळे या विषयावर डॉक्टरकडूनचं सल्ला घेणं योग्य आहे. डेंटिस्ट लूक थोरले Luke Thorley यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की, ब्रश करण्यापूर्वी टूथब्रश धुणे चुकीचे आहे. ब्रश ओला केल्याने दातांवर टूथपेस्टचा प्रभाव कमी होतो. याविषयी डॉक्टर राहा यांचेसुद्धा हेच मत आहे. त्याचं म्हणणं आहे की, तुम्हाला आधी ब्रश धुण्याची सवय असेल तर तो हलकासा ओला करा. कारण टूथपेस्ट अधिक पातळ असल्यास ब्रशिंग व्यवस्थित होत नाही. परिणामी, तुमच्या दातासांठी ते नुकसानदायी ठरू शकते. याच कारणामुळे ब्रश केल्यानंतर नीट चूळ भरणेही गरजेचे आहे. जेणेकरून, टूथपेस्ट दातात अडकून राहणार नाही.

 Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.