Now Reading:
रिचा काशेलकर: वेडिंग फोटोग्राफीतील चंदेरी नाव
रिचा काशेलकर: वेडिंग फोटोग्राफीतील चंदेरी नाव

रिचा काशेलकर हे नाव आज भारतभर सनई चाैघड्यांच्या सुरात दुमदुमतंय. एकेकाळी आर्किटेक्चर करत असलेली ही मुंबईची मुलगी आज देशातील उत्तम वेडिंग फोटोग्राफर्सपैकी एक आहे. देशभरात जवळपास २०० जोडप्यांच्या आयुष्यातील सोनेरी क्षणांना आपल्या विशिष्ट शैलीत सांधून आपला वेगळा असा ठसा तिने उमटवला. तिचा हा प्रवास एखाद्या राेमॅण्टिक चित्रपटापेक्षा कमी नाही.

काॅलेजच्या दिवसात फोनमुळे फोटोग्राफीचा छंद जडला. फोटोची बांधणी (compose) करणे, लोकांच्या निखळ भावना टिपणे याची तिला गोडी लागली. फेसबुकमार्फत प्रशंसा मिळत होती, तिचं काम चर्चेत येत होतं.

‘लग्न एकदाच होतं’-

अशाच एका व्यक्तीने फेसबुकवर तिचं काम पाहिलं आणि तिला लग्नाचे फोटो काढण्यास विचारलं. रिचा थोडी साशंक होती. ‘लग्न एकदाच होतं’, या अविस्मरणीय क्षणांची साठवण करणे मोठ्या जबाबदारीचे काम. तिने नकार कळवला. पण शेवटी तिच्या मैत्रिणीने तिला हे आव्हान स्विकारायला मनवले. आणि सुरू झाला एक रम्य प्रवास. 

सुरूवात थोडी आव्हानात्मकच होती. साहजिकच कोणत्याही तांत्रिक शिक्षणाच्या अभावी बऱ्याच चुका होत. पण ती प्रत्येक अनुभवातून धडा घेत होती. मागे फक्त एकच विचार होता. फोटोंमध्ये लग्नाचा साज हरवता नये कारण ‘लग्न एकदाच होतं’!

सिग्नेचर स्टाइल

कॅमेरामधून विवाह मंडपातील प्रत्येक भाव जशाच् तसा जीवंत करण्याच्या तिच्या लकबीने देशभरातील प्रेमीयुगुलांना तिच्या प्रेमात पाडलंय. पण कितीही लोकप्रियता मिळाली तरी तिने एकटीनेच काम करणे पसंत केले. तिच्या मते विवाहसोहळ्यातील सात्विकता चिरंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यात ती कोणतीही तडजोड करत नाही.

याच प्रवासात तिला पवनमध्ये तिचा पार्टनर भेटला. आचार जुळले, विचार जुळले. दोघांनी लग्न करायचे ठरवले. आता ते एकत्रितपणे विवाहसोहळे आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.

रिचाच्या वाटचालीत अजून बरेच अध्याय यायचेत. तिला नेटवरचा सलाम!

All pictures have been taken from Richa Kashelkar’s Instagram.

Input your search keywords and press Enter.