Now Reading:
रेसिपी : असा करा हॉटेलसारखा सुटसुटीत जिरा राईस
रेसिपी : असा करा हॉटेलसारखा सुटसुटीत जिरा राईस

हॉटेलमधील जिरा राईस कोणाला नाही आवडत? पण घरी बनवताना हॉटेलसारखा सुटसुटीत दाणेदार जिरा राईस काही केल्या बनत नाही. त्याची पण एक शक्कल आहे. जाणून घेण्यासाठी वाचा ही पाककृती-

साहित्य

१ वाटी बास्मती तांदूळ, दिड वाटी पाणी, १ चमचा तूप, चवीनुसार मीठ, १ चमचा तेल, जिरे, चिरलेली कोथिंबीर

भात तयार करण्याची कृती

१. एक वाटी बासमती तांदूळ अर्धा तास भिजवा.

२. मध्यम आचेवर फ्राय पॅन गरम करण्यासाठी ठेवा.

३. भिजवलेले तांदूळ फ्राय पॅनमध्ये काढून त्यात दीड वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घाला.

४. त्यानंतर मोठ्या आचेवर उकळी येऊ द्या.

५. उकळी आल्यावर गॅस कमी करून मध्यम आचेवर ठेवा आणि त्यात एक चमचा साजूक तूप घाला.

६. भांड्यावर झाकण ठेवून तांदळातील पाणी जवळपास पूर्ण मुरेपर्यंत मध्यम आचेवर ते शिजवा. यासाठी अंदाजे १५ मिनिटे लागतील.

७. गॅस बंद करून १० मिनिटासाठी भात तसाच झाकून ठेवा.

८. काट्याच्या चमच्याने भात सुट्टा करा.

फोडणी कृती

१. तव्यामध्ये १ चमचा तेल मध्यम आचेवर गरम करा. त्यात जिरे टाकून ते फुलू द्या.

२. त्यावर शिजवलेला भात आणि चिरलेली कोथिंबीर घाला.

३. मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे भात व्यवस्थित परतून गॅस बंद करा.

तयार आहे तुमचा गरमागरम आणि सुटसुटीत जिरा राईस.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहा.

Input your search keywords and press Enter.