Now Reading:
सॅनिटरी पॅडच्या रॅशपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सॅनिटरी पॅडच्या रॅशपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय

मासिक पाळीची सुरुवात म्हणजे मुलीचे स्त्रीमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया. जसजशी मुलगी मोठी होत जाते, तिच्यात शारीरिक व मानसिकरीत्या अनेक बदल घडतात. पण मासिक पाळी हा चार चौघीत बोलायचा विषय नाही अशी समजूत समाजात बाळगली जाते. या विषयी मनमोकळेपणाने चर्चा होत नाही म्हणून स्त्रिया त्यांच्या संशयाचं निरसन करण्यासाठी लाजतात. मासिक पाळीचा काळ वेदनामय, गोंधळात टाकणारा आणि गैरसोयीचा असतो. कारण या चार ते पाच दिवसात स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल घडत असतात. या काळात सॅनिटरी पॅड वापरल्याने त्वचेला रॅश (त्वचा चिघळणे, खरचटल्यासारखे होणे किंवा पुरळ उटणे) होऊ शकते. सॅनिटरी पॅडमध्ये असलेले रसायन योनीसाठी घातक ठरू शकते. पॅडच्या ओलसरपणामुळे सुद्धा रॅश होण्याची शक्यता असते.

मासिक पाळीच्या वेळेस पॅड रॅशच्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय:

बर्फ

बर्फाने वेदना आणि त्रासदायक संवेदना कमी होतील. बर्फाचे दोन तुकडे घ्या आणि ते स्वच्छ कापडात गुंडाळा आणि वेदना होत असलेल्या भागावर लावा. बर्फाच्या थंडाव्याने वेदना कमी होईल.

खोबरेल तेल

खोबरेल तेलापेक्षा दुसरा उत्तम उपाय नाही.ते त्वचेला मुलायम करतं. रात्री झोपण्याआधी थंड पाण्याने वेदना होत असलेली जागा स्वच्छ करा आणि तिथे खोबरेल तेल लावा. रात्रभरात तुम्हाला होत असलेला त्रास थांबेल. तसेच, खरचटल्यासारखे वाटत असलेली त्वचा नरम पडेल.

बेकिंग पावडर

खाज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडाचा वापरू करू शकता. दोन चमचे बेकिंग पावडर पाण्यात मिसळून हे मिश्रण लावा. ते सुकल्यावर थंड पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने ती जागा पुसा.

कडुलिंबाची पाने

कडुलिंबाच्या पानांना १५-२० मिनिटे गरम पाण्यात भिजवा. पाणी थंड झाले की रॅशवर हे पाणी लावा. कडुलिंबाची पाने त्वचेसाठी चांगली असतात.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.