Now Reading:
रेसिपी : होळी व दिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत शंकरपाळी!
रेसिपी : होळी व दिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत शंकरपाळी!

दिवाळीच्या फराळातील खास पक्वान म्हणजे शंकरपाळी. महाराष्ट्रात सणासुदीच्या दिवशी शंकरपाळी केली जाते. देशभरात ही विविध नावाने ओळखली जाते. गुजरातमध्ये शंकरपाळीला ‘शंकरपारा’ म्हणतात तर, उत्तर भारतात ‘स्वीट तुकडी’, तामिळनाडूमध्ये ‘कलकला’ तर आंध्रमध्ये ‘टीपी मैदा बिस्कीट’ म्हणून शंकरपाळीला संबोधलं जातं.

तर जाणून घेऊ शंकरपाळीसाठी साहित्य काय लागतं आणि बनवण्याची कृती-

 

साहित्य-

२५० ग्रॅम मैदा

१ कप पाणी

१ कप साखर

१ कप तूप

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

 

कृती-

१. कढईमध्ये पाणी गरम करून घ्या. त्यात साखर, तूप, मीठ घाला व नीट ढवळून घ्या.

२. मिश्रणाला नीट उकळी येऊ द्या त्यानंतर गॅस बंद करा.

३. हे मिश्रण एका वाटीमध्ये काढून घ्या व त्यास थंड होऊ द्या.

४. या मिश्रणात मैदा घालून त्याचं पीठ मळून घ्या.

५. मळलेल्या पिठाचा मोठा गोळा करून त्याची पोळी लाटून घ्या. ही पोळी अगदी जाड किंवा पातळ असता कामा नये.

६. पोळी लहान लहान चौकोनी किंवा पतंगाच्या आकारात कापून घ्या.

७. त्यानंतर हे तुकडे तेलामध्ये मंद आचेवर डीप फ्राय करून घ्या.

८. त्यांना लालसर सोनेरी रंग आला की शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढा.

९. शंकरपाळ्या थंड झाल्यावर त्यांना हवाबंद डब्यामध्ये ठेवा.

गुजरातमध्ये शंकरपाळीला ‘शंकरपारा’ म्हणतात तर, उत्तर भारतात ‘स्वीट तुकडी’

तयार आहे खमंग कुरकुरीत शंकरपाळी!

तुम्ही शंकरपाळीच्या रेसिपीचा व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता. 

Input your search keywords and press Enter.