Now Reading:
रेसिपी : गुजरातच्या खाण्याचा चविष्ट सुगंध दरवळू दे तुमच्या घरात; शिका उंधियू बनवायला
रेसिपी : गुजरातच्या खाण्याचा चविष्ट सुगंध दरवळू दे तुमच्या घरात; शिका उंधियू बनवायला

गुजराती पदार्थ म्हटलं की, उंधियूचा उल्लेख आवर्जून केला जातो. तर चला बघूया कसा करतात हा  उंधियू.

 

उंधियू बनवण्याची सामग्री:-

१. वांगे, कच्च केळं आणि बटाट्याच्या फोडी

२. पापडी

३. वाल पापडीचे दाणे

४. तुरीची डाळ

५. मुठिया

६. मीठ

७. साखर/ गूळ

८. गरम मसाला

९. नारळाचं वाटण (तसेच आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, ओवा आणि धणे-जिरे पण वाटून घ्या)

 

कृती:-

१. सगळ्यात आधी अर्धा कप तेल गरम करून ओवा आणि हिरव्या मिरचीची फोडणी घाला. त्यानंतर कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट घाला. ते नीट मिसळून घ्या आणि त्यात जराशी हळद पावडर टाका.

२. आता आपण ज्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत ( वांगं, कच्च केळं आणि बटाट्याच्या फोडी ) त्या पॅनमध्ये टाका.

३. मग, वरून वाल पापडी आणि तुरीचे दाणे घालून घ्या. शेवटी कापलेली पापडी टाकून भाजी मिक्स करून घ्या. सगळ्या भाज्यांना नीट तेल लागलं पाहिजे.

४. भाज्या नीट मिक्स झाल्या की, त्यात नारळाचं वाटण टाका. या वाटणाने भाजीला हवी ती चव मिळेल.

५. यानंतर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून भाजी ढवळून घ्या.  

६. भाजीला एक उकळी आली की, मग वरून गरम मसाला आणि थोडंसं गूळ किंवा साखर भाजीत घाला जेणेकरून भाजीला तिखट गोड अशी चव येईल.

७. यानंतर पॅनवर एक झाकण ठेऊन भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.

८. शेवटी त्यात मुठिया घालून १० मिनिटे भाजी शिजवा. उंधियू खाण्यासाठी तयार आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.