Now Reading:
किचन कॉर्नर : झटपट नारळाच्या वड्या
किचन कॉर्नर : झटपट नारळाच्या वड्या

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सणासुदीच्या दिवशी मिठाई म्हणून वाटायलाही नारळाच्या वड्या एक सोपा, स्वादिष्ट व उत्तम प्रकार आहे. चला तर जाणून घेऊ साहित्य आणि कृती:

नारळाच्या वड्या

साहित्य-

  • खवलेला नारळ- एक कप
  • मावा- १ कप (२०० ग्रॅम)
  • पिठीसाखर- १ कप
  • पिस्ते  – ८ ते १०
  • तूप- १ टेबलस्पून

कृती-

१. पिस्त्याचे काप करा व एका वाटीत ठेवा. एका प्लेटला तुप लावून घ्या.

२. खवलेला नारळ तांबूस होईपर्यंत परतून घ्या आणि एका वाटीत काढा.

३. त्यानंतर मंद आचेवर मावा परतून घ्या, हलका चॉकलेटी रंग होईपर्यंत मावा ढवळत राहा. माव्याचं तूप सुटायला लागल्यावर गॅस बंद करा.

४. मावा थंड झाल्यावर त्यात परतलेला नारळ घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या. मग त्यात पिठीसाखर घालून एकत्र ढवळून घ्या.

५. हे मिश्रण तूप लावलेल्या प्लेटवर काढून एकसमान पसरा. त्यावर पिस्त्याचे तुकडे वरून टाका आणि त्यावर हलका दाब द्या.

६. अर्ध्या तासासाठी बर्फी सेट होण्यासाठी बाजूला ठेवा. आणि मग हव्या त्या आकारात कापून घ्या. झाली तयार नारळाची वडी.

सविस्तर कृती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहा. आणि घरच्यांना करून घाला स्वादिष्ट नारळाची वडी.

 

Input your search keywords and press Enter.