Now Reading:
खुशखबर! तरुणांसाठी भारतीय रेल्वे प्रशासन घेऊन येतंय ४००० नवीन जागा!
खुशखबर! तरुणांसाठी भारतीय रेल्वे प्रशासन घेऊन येतंय ४००० नवीन जागा!

सरकारी नोकरी करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय रेल्वे आपल्या कामकाजाचा आवाका वाढवण्याच्या हेतूने नोकरीच्या संधीची नवीन दालने खुली करत आहे. तिकिट निरिक्षक (टीसी) , गार्डच्या पदासाठी जवळपास ४००० जागा उपलब्ध होणार आहेत.

रेल्वे भरतीची लाट

‘Skill India Initiative’ अंतर्गत तीस हजार शिकाऊ कारागिरांच्या प्रशिक्षणाची घोषणा केली होती. तसेच गेल्या महिन्यातच लोको पायलट, टेक्निशियन्ससाठी भारतीय रेल्वेने तब्बल ९०,००० जागांच्या उपलब्धतेची घोषणा केली होती. यामध्ये फिटर, क्रेनचालक, सुतार, ट्रॅक व्यवस्थापक इ. हुद्दयांसाठी जागांची घोषणा करण्यात आली होती.

विभागीय अधिकाऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद

यासोबतच भारतीय रेल्वे कर्मचारी भरतीच्या प्रक्रियेस अधिकाधिक सुनियोजित करण्याच्या प्रयत्नात आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये विभागीय अधिकाऱ्यांनी कर्मचारी संख्येची कमतरता रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणली. ही उणीव भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नवनवीन उपाययोजना अंमलात आणण्यास सुरुवात केली. पूर्वी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी लागणारा दोन वर्षांचा वेळ कमी करून ६ महिन्यांचा करण्यात आला.

अतिरिक्त जागांच्या घोषणेची अपेक्षा

भारतीय रेल्वे मालाच्या कार्यक्षम वाहतूकीसाठी प्रयत्नशील आहे. यासाठी प्रगत पायाभूत सुविधांची गरज आहे. यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने ४००० जागांच्या भरतीची घोषणा होण्याची अपेक्षा करण्यात येतेय. यासोबतच तिकिट आरक्षण लिपिक, चौकशी कारकून व फार्मासिस्ट्स यांसाठी अतिरिक्त २००० जागांची घोषणा अपेक्षित आहे.

कर्मचारी भरतीच्या जागांचे विवरण खालीलप्रमाणे

३००० जागा तिकिट निरिक्षक पदासाठी
१००० जागा गार्डसाठी

भरतीसाठी १८ ते २९ ही वयोमर्यादा राखण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

गार्डसाठी शैक्षणिक पात्रता

दहावी + बारावी पूर्ण (सरकारमान्य संस्थेमधून)

तिकिट निरिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता

पदवीधर (कोणत्याही सरकारमान्य संस्था किंवा विद्यापिठामधून)

उमेदवारांना सामान्य ज्ञान, भाषा व चालू घडामोडी या विषयांवर आधारित लेखी परिक्षा द्यावी लागेल. यासोबतच उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी पार करावी लागेल. निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन ५,२०० ते २०,२०० रूपये यादरम्यान असेल.

Input your search keywords and press Enter.