Now Reading:
केवळ चहा विकून महिन्याला लाखोंची कमाई करणारा पुणेकर!
केवळ चहा विकून महिन्याला लाखोंची कमाई करणारा पुणेकर!

भाजपने जेव्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून घोषित केले तेव्हा त्यांचा प्रचार चहावाला म्हणून करण्यात आला होता. खुद्द मोदी यांनीही ते चहावाला राहिल्याचा अभिमान त्यांच्या भाषणातून अनेकदा व्यक्त केला आहे. एक चहावाला कुठेच्या कुठे जाऊन पोहचू शकतो हे त्यामुळे आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आता आणखी एक चहावाला सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे.

पण हा चहावाला चर्चेत येण्याचे कारण काही वेगळेच आहे ते म्हणजे त्याची मासिक कमाई. हा चहावाला महिन्याला तब्बल १२ लाख रुपये कमवतो. अशा या पुणेरी अवलियाचे नाव आहे नवनाथ येवले.

चहा विकणारे तर खूप आहेत. आजकाल आपल्याला गल्लोगल्ली चहाची टपरी दिसते. पण त्यातूनही आपले स्थान निर्माण करण्यासाठी येवले यांनी तब्बल चार वर्षे संशोधन करून त्यांचा स्वतःचा असा चहाचा ब्रॅण्ड उदयास आणला. नवनाथ येवले, हे पुण्यातील ‘येवले टी हाउस’चे संस्थापक आहेत. पुण्यात ‘येवले टी हाउस’चे दोन सेंटर्स आहेत.

प्रत्येक सेंटरवर १२ लोक काम करत असून दिवसाला ३-४ हजार कप चहा विकला जातो. अशाप्रकारे हे टी हाउस दर महिन्याला तब्बल १२ लाख रुपये कमवते. येवले यांनी लवकरच जागतिक पातळीवर त्यांचा ब्रॅण्ड नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याविषयी ते म्हणाले की, आम्हाला जवळपास १०० सेंटर्स खोलायचे आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार निर्माण होईल.नवनाथ येवले, हे पुण्यातील ‘येवले टी हाउस’चे सहसंस्थापक आहेत. 

आपल्या व्यवसायाविषयी येवले म्हणतात, आमच्या टी हाउसमुळे अनेक भारतीयांना रोजगार मिळाला आहे. दिवसागणिक आमच्या व्यवसायाचा विस्तार होत असल्याने आम्ही खूप खूश आहोत. पुण्यात येवले टी हाउस बरेच प्रसिद्ध आहे. त्यांच्या या प्रसिद्धीमुळे टी हाउसचा विस्तार होत आहे. इतकेच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास इच्छूक असलेल्यांना येवले यांच्या टी हाउस व्यवसायामुळे प्रेरणा मिळत आहे.

येवले टी हाउसचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Input your search keywords and press Enter.