Now Reading:
जेव्हा तुमची कन्या करेल यौवनात पदार्पण; तुम्ही व्हा तिची सखी
जेव्हा तुमची कन्या करेल यौवनात पदार्पण; तुम्ही व्हा तिची सखी

अगदी कालचीच गोष्ट वाटेल जेव्हा तुमची मुलगी रांगत रांगत घर-भर फिरायची. कधी तिने बालपण ओलांडलं आणि यौवनात पदार्पण केलं ते कळलंच नसेल. पण आता वेळ आली आहे तिला काही गोष्टी समजावून सांगण्याची ज्या तिला एक स्त्री असल्याची जाणीव करून देतील. जसजशी ती मोठी होत जाईल तसे तिला शारीरिक व मानसिक प्रश्न पडत जातील. या प्रश्नांचं निरसन करणं एक आई म्हणून तुमची जबाबदारी आहे.  

१. तुमची मुलगी ८-९व्या वर्षात पदार्पण करतानाच तिला तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल माहिती देण्यास सुरु करा.

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा बदल होणं साहजिक असत आणि यात काही घाबरायच कारण नाही यावर तिचा विश्वास बसू द्या.

२. प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळी सुरु होण्याची क्रिया ८-१६ वर्षामध्ये होऊ शकते. तुम्हाला तुमच्या मुलीस समजावून द्यावं लागेल की ही क्रिया फक्त स्त्रियांमध्येच होते पुरुषांमध्ये नाही.

Image Source: Shutterstock

३. तुमच्यात आणि तुमच्या मुलीमध्ये एक असं वातावरण ठेवा ज्यात ती तुमच्याशी कोणत्याही विषयावर निसंकोचपणे बोलू शकेल आणि प्रश्न विचारू शकेल.

तिला अशी पुस्तके आणून द्या ज्यात तिला अश्या विषयांची अधिक माहिती मिळू शकेल.

४. या काही दिवसात तिचे वजन जरा वाढलेले दिसेल, मानसिकदृष्ट्या वेगळेपण जाणवू शकते.

तिला तिच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आयुष्यावर वाईटदृष्ट्या परिणाम होऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी.

तिच्या वागण्यात बदल जाणवू शकतो, पण तिला समजून घेऊन तिच्या स्त्री असण्याचा अभिमान तिला वाटू देणं तुमचं कार्य आहे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.