Now Reading:
‘ति’च्यासाठी प्रियदर्शनीची साथ
‘ति’च्यासाठी प्रियदर्शनीची साथ

पुरुष प्रधान संस्कृती ही काळाबरोबर बदलताना दिसतेय. पण तरीही समाजात बलात्कार आणि अपहरणाच्या संख्या वाढत असल्याचेही आढळते. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी महिलांनीच स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. वाहन चालकाचं काम हे पिढ्यानपिढ्या पुरुष करत आले आहेत. ‘सुसीबेन शाह’ची प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस‘ने या रीतीला तोड दिली आहे.

महिला या चांगल्या वाहन चालक नसतात असा त्यांच्याबाबतचा एक गैरसमज असतो. या गैरसमजुतीवर मात करून या महिला आपला यशस्वी असा व्यवसाय चालवतात. ‘सुसीबेन शाह’ यांनी पुढाकार घेऊन ही कॅब सेवा सुरु केली जी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करते. पण हा नुसताचं एक व्यवसाय नसून समाजातील महिलांच्या गरजेची जाणीव ठेऊन सुरु केलेली एक कॅब सेवा आहे. महिलांना कोणत्याही परिस्थतीत असुरक्षित वाटू न देणे हे यांचे ध्येय आहे. त्यासाठी महिला चालकांनी ट्रेनिंग घेऊन ही नोकरी स्विकारली.

महिलांनी सशक्तीकरणाच्या नावाखाली फक्त लोणचं पापडाचा व्यवसाय सुरु न करता एका नवीन क्षेत्रात झेप घेतली. हा संपूर्ण व्यवसाय स्त्रियाचं हाताळतात. दिवसातून १०-१२ तासांची शिफ्ट असते. या स्त्रियांना  तीन महिन्याची ट्रेनिंग दिली जाते ज्यात नुसतं ड्रायविंग न शिकवता त्यांचं वक्तृत्व, आर्थिक ज्ञान, स्वच्छता, योग, आणी-बाणी हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.

प्रत्येक स्त्रिला यातून महिन्याला १०-१२ हजाराचं उत्पन्न मिळतं. ज्या ते स्वतःबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी वापरू शकतात. या स्त्रियांनी स्वतःच्या आयुष्याची गाडी एका प्रभावी मार्गावर चालवून स्वतः बरोबर महिला वर्गाचंही भलं केलं आहे.

प्रियदर्शनी बुकिंग क्रमांक – +९१ – ९८२०२२११०७ आणि +९१- ९३२०८४५०६४ 

लॅन्डलाईन क्रमांक – +(९१)- (२२)-४३३३३९९९ आणि +(९१)- (२२)- ६६६०८७७९

Input your search keywords and press Enter.