Now Reading:
सुरक्षित डिलिव्हरीसाठी गर्भधारणे पूर्वी आहारातील पोषक बदल
सुरक्षित डिलिव्हरीसाठी गर्भधारणे पूर्वी आहारातील पोषक बदल
pregnancy tips

तुम्ही जर इथवर आला आहात तर नक्कीच तुमच्या डोक्यात घरात पाळणा हलवायचा विचार घोळतोय. पण तत्पूर्वी तुम्हाला तुमच्या आहारात व जीवनशैलीत काही बदल करावे लागतील, तर जाणून घ्या काही महत्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

१. तीन महिन्यापूर्वी-

गर्भधारणा करण्याच्या निर्णयापूर्वी दोघांनीही डॉक्टरकडून तपासणी करून व आवश्यक लसी टोचून घ्या.

गर्भधारणेपूर्वी मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब आदी आजार तपासून घ्या हे बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

गर्भधारणेच्या वेळी हिरड्यांचे त्रास होणे सामान्य आहे म्हणून आधीच दातांच्या डॉक्टरांकडून तपासून घ्या

२. दोन महिन्यापूर्वी-

गर्भधारणेच्या पूर्वी आहारात आवश्यक पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतोय ना ते पहा आणि त्यानुसार आहारात बदल करा. व्हिटॅमिन युक्त आहार घ्या.

तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवा, त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा राहिल.

नियमित व्यायाम करा जेणेकरून डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्यास मदत होते.

३. एक महिन्यापूर्वी-

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यसन असल्यास ते जितकं कमी करता येईल तितकं करा. डॉक्टर म्हणतात की, गर्भधारणेदरम्यान किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना मासे खाणे गर्भवती स्त्रीसाठी चांगले नसते. मासे खाणं कमी करा, त्याचा तुमच्या प्रसवक्षमतेवर परिणाम होतो.

 

घरातील अशी कामे ज्यातून संसर्ग किंवा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो ती कामे दुसऱ्यांना नेमून द्या.

Cover Image Source: Pixabay

Input your search keywords and press Enter.