Now Reading:
आई होत असताना हे १० सोपे नियम पाळा आणि बाळंतपणाच्या वेळचा त्रास टाळा
आई होत असताना हे १० सोपे नियम पाळा आणि बाळंतपणाच्या वेळचा त्रास टाळा

९ महिने पोटूशी असण्याचा काळ अधिक वाटू शकतो, पण विश्वास ठेवा हा काळ कधी निघून जाईल आणि तुमच्या हातात एक गोड गोंडस बाळ असेल हे कळणारसुद्धा नाही. पण या काळात तुम्हाला काही गोष्टींची तयारी करून ठेवावी लागेल.

१. जन्म देण्याची प्रक्रिया-

तुमच्या डॉक्टरकडून किंवा पुस्तकांद्वारे बाळाला जन्म देण्याची रीतसर प्रक्रिया जाणून घ्या. प्रसववेदनेच्या वेळेस श्वास घेण्याचे तंत्र त्याच बरोबर इतर गोष्टींचा अभ्यास करा. 

२. बाळासाठी डॉक्टर-

तुमच्या बाळाच्या जन्मासाठी एक निश्चित डॉक्टर नेमा जे तुम्हाला त्याच्या जन्माबदल सर्व ज्ञान देईल. .

३. पतीला ज्ञान देणे-

तुम्हाच्या पतीला बाळाच्या जन्म प्रक्रियेबद्दल तेवढंच ज्ञान असणं गरजेचं आहे जेवढं तुम्हाला आहे. तुम्ही वाचलेलं पुस्तक त्यांना देखील वाचायला द्या.

४. इतर आयांशी बोला-

ज्या महिलांना बाळांना जन्म देण्याचा अनुभव आहे त्यांच्याशी बोला, त्यांच्याकडून शंकांचे निरसन करून घ्या.

५. भावंडाना तयार करा-

जर तुम्हाला अजून मुले असतील तर त्यांना भावंडं मिळणार आहेत याची जाण त्यांना द्या. त्यांनी स्वतःच्या बाजूने काय काय काळजी घेतली पाहिजे हे त्यांना समजावून सांगा. 

६. आजी किंवा आयांना मदतीस तयार ठेवा-

बाळाच्या आजीकडून काही मदत घेता आली तर नक्की घ्या. बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला त्यांची गरज भासेल. आजी नसेल तर आया शोधा व त्यांना कामावर नेमा. 

७. प्रसव वेदना कधी होऊ शकतात हे जाणून घ्या-

९ महिन्यांनंतर तुम्हाला प्रसववेदना जाणवू लागतील. जेव्हा आकुंचना वेदना अधिक प्रमाणात जाणवू लागतील तेव्हा तुमच्या बालकाचा जन्म जवळ येत असेल.

८. जन्म प्रक्रियेत कोणाची गरज लागू शकते जाणा-

बाळाच्या जन्मावेळी तुम्हाला पतीची सोबत लागणार असेल तर त्यांच्याशी आधी याबाबत संवाद साधा.

९. बॅग भरा-

हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या गोष्टी आधीच भरून ठेवा. टूथब्रश पासून लागणारी औषधे सगळंच भरून ठेवा म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही.

१०. गरजेच्याच वस्तू भरा-

बॅग भरताना तुम्ही गरजेच्याच वस्तू भरताय याची काळजी घ्या. विना कारण बॅग जड करण्यात काही अर्थ नाही.

 

Input your search keywords and press Enter.