Now Reading:
लवकरच लग्न होणाऱ्या नवरींसाठी ब्युटी टिप्स!
लवकरच लग्न होणाऱ्या नवरींसाठी ब्युटी टिप्स!

लग्नाच्या तयारीत खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कपडे, दागिने, मंडप, आमंत्रणे आणि बरंच काही. पण या सगळ्या गडबडीत ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असूनही तिच्याकडे दुर्लक्ष होतं. ते म्हणजे “स्वतःकडे”!

१. त्वचेचं आरोग्य (Healthy Skin) –

तुमच्या त्वचेची काळजी घेणं तुमच्या हातात आहे. कोणताही ऋतू असो त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्यामुळे फेस स्क्रब, मॉइश्चरायझरचा वापर करून तुमच्या त्वचेला मुलायम ठेवा.

२. घरगुती उपाय-

जर तुम्हाला बाजारात मिळणारे कोणतेही प्रॉडक्ट्स वापरणं पटत नसेल तर, तुम्ही घरगुती गोष्टींचा वापर देखील करू शकता. बेसन, सफरचंद, लिंबू, पपई, मध यांसारख्या गोष्टी वापरून तुम्ही त्वचा किंवा केसांची काळजी घेऊ शकता.

३. हाता-पायाचं सौंदर्य-

तुमच्या हात आणि पायांना तेलाने मसाज करत राहा जेणेकरून शरीरावर काळपट किंवा सुकलेली त्वचा असेल तर ती निघून जाईल.

४. व्यायाम (Exercise)-

दिवसातून एकदा थोडा वेळा व्यायामाला केलात तर शरीर सुदृढ राहील. तुम्हाला दिवसभराच्या कामात ताकद मिळेल आणि शरीर पण काटक राहील.

५. झोप-

८ तास झोप गरजेची असते त्यामुळे तुम्हाला शांत झोप आणि आराम मिळतोय ना याकडे लक्ष द्या. नाही तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर देखील दिसून येऊ शकतो आणि लग्नात तुमचं सुंदर दिसणं गरजेचं आहे की नाही?

Input your search keywords and press Enter.