Now Reading:
दुष्काळात हिवरे बाजारचा शिल्पकार झाला रांगड्या मातीतील शान; मिळवून दिलं गतकालीन वैभव
दुष्काळात हिवरे बाजारचा शिल्पकार झाला रांगड्या मातीतील शान; मिळवून दिलं गतकालीन वैभव

हिवरे बाजार जगाच्या नकाशावरही प्रसिद्ध असणार गाव. आपल्या प्रगतीने आणि विकासाने सगळ्या जगाला आपली नोंद घ्याव लावणार हे अहमदगरमधील एक गाव.  पण आता जशी स्थिती आहे ती या आधी कधीच नव्हती. सतत दुष्काळाने ग्रस्त, पिण्याच्या पाण्याची वणवण अशा बऱ्याच समस्यांनी ग्रासलेले गाव होते.

१९७२च्या आधी संपन्न असलेल्या गावाला निसर्गाची नजर लागली. १९७२ साली पडलेल्या दुष्काळात या गावाचे वैभव नष्ट झाले. आपल्या गावाची परिस्थिती पाहता गावातील एक तरुणाने गावाच्या विकासासाठी कार्य करायचे ठरवले.

पुण्यातून शिक्षण घेऊन आलेला हा तरुण गावाचा सरपंच झाला व त्यानंतर त्याने गावाच्या कायापालटाला सुरुवात केली. पोपटराव पवार असे त्या तरुण सरपंचाचे नाव. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी गावातील प्राथमिक सुविधा सुधारण्यावर भर दिला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साथीने हिवरे बाजारचा विकास करण्यास सुरुवात केला. ज्या गावातील कामासाठी सरकारच काय तर स्वयंसेवी संघटनाही पुढे येत नव्हत्या हळूहळू ते गाव आदर्श गावांच्या यादीत समाविष्ट झाले.

ही किमया केवळ एका माणसाच्या बदलाच्या दृष्टीकोनाने झाली. सकारात्मक बदल व विकास आणि गांधीचे आदर्श गावाच्या स्वप्नाला प्रेरणा मानून पोपटराव पवार यांनी हिवरे बाजाराला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. ‘First National Award for community led water conservation’ चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

Cover Image Source: Tehelka

Input your search keywords and press Enter.