Now Reading:
दुकानातील बाटलीबंद पाणी घातक; कॅन्सरचा धोका!
दुकानातील बाटलीबंद पाणी घातक; कॅन्सरचा धोका!

उन्हाळा आलाय. रखरखत्या उन्हात वणवण करताना तहान लागणं साहजिकच आहे. पण अशी अवेळी तहान लागल्यावर दुकानातून पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पित असाल तर सावधान! या पाण्यापासून आहे तुम्हाला कॅन्सरचा धोका.

जगभरातून मागवले नमुने

न्यूयॉर्कमधील संशोधकांनी असा दावा केलाय की त्यांना बाटलीबंद पाण्यामध्ये प्लास्टिकचे कण आढळले आहेत. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या संशोधकांनी जगभरातील बाटलीबंद पाण्याचे निरनिराळे नमुने तपासून पाहिले. त्यामध्ये ९ देशांत विकल्या जाणाऱ्या ११ नामवंत ब्रॅण्डचा समावेश होता. यामध्ये भारतासहित अमेरिका, ब्राझिल, केनिया, मेक्सिको, चीन, थायलंड, लेबनॉन, इंडोनेशिया या देशांतील बाटलीबंद पाण्याचे नमुने तपासण्यात आले. भारतामधून दिल्ली, चेन्नई, मुंबईसारख्या १९ ठिकाणांहून पाण्याचे नमुने नेण्यात आले होते.

कॅन्सरप्रवण घटक

या संशोधनात असे आढळून आले की, एकूण नमुन्यांपैकी ९३ टक्के पाण्याच्या नमुन्यांत कॅन्सरप्रवण घटक आहेत. अहवालानुसार, बाटलीतील पाण्यात प्रतिलीटर १०.४ मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले. यात अॅक्वाफिना, बिस्लेरी, अॅक्वा अशा मोठ्या ब्रॅण्डचा समावेश आहे. बिस्लेरीमध्ये तर प्रतिलीटर ५००० हून मायक्रोप्लास्टिक कण आढळले. 

नळाच्या पाण्याहून घातक

यापूर्वी नळाच्या पाण्यावर केलेल्या अभ्यासापेक्षा या बाटलीबंद पाण्यात आढलेल्या दूषित कणांचे प्रमाण दुप्पट आहे. यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की हे किती भयावह आहे ते!

दुसरीकडे कंपन्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की ते गुणवत्तेच्या बाबतीत सर्व आवश्यक काळजी घेतात. पण अहवालांचे आकडे वेगळंच चित्र दाखवत असल्याचे दिसते.

 Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.