Now Reading:
उन्हाळ्यातील सहलीसाठी भारतातील १० पर्यटनस्थळे
उन्हाळ्यातील सहलीसाठी भारतातील १० पर्यटनस्थळे

भारतातील उन्हाळा जगात सगळ्यात उष्ण मानला जातो. तिन्ही बाजूने समुद्राने घेरलेल्या या देशात कधी कधी तापमान असह्य होतं. पण भारतात विविध पर्वत, टेकड्या, किनारे, नद्या, जंगल आहेत जिथे लोक उन्हाळ्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी जाऊ शकतात. ही आहेत भारतातील १० ठिकाणे जिथे तुम्ही उन्हाळ्यात भेट देऊ शकता.

१. धर्मशाळा, हिमाचल प्रदेश

जर तुम्हाला तिबेटिअन संस्कृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर ही जागा उत्तम आहे. हिमाचल प्रदेशातील हे ठिकाण नैसर्गिकरित्या सुंदर तर आहेच त्याच बरोबर येथील बाजार आणि कॅफेला नक्की भेट द्या.

२. नैनिताल

टेकड्यांच्यामध्ये स्थित नैनिताल दिल्ली आणि चंदीगडपासून जवळ आहे. इथलं तलाव खूपच सुंदर आहे. येथे तुम्हाला सूर्यास्ताच्या वेळेस विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील.

३. काश्मीर

हिंदी सिनेमात पाहिलेला काश्मीर प्रत्यक्षात त्याहूनही खूप सुंदर आहे. दाल लेक, हाउसबोट, मुगल गार्डन, गुलमर्ग, सोनमर्ग सारखी ठिकाणं तुम्ही येथे पाहू शकता. श्रीनगरमध्ये असलेल्या मार्केटमध्ये तुम्हाला लाकडी खेळणी, काश्मिरी चादरी, कपडे, ड्राय फ्रुटस खरेदी करायला मिळतील.

४. लडाख

प्रत्येक बाइक रायडरच स्वप्न असतं एकदा तरी मित्रांसोबत लडाखची ट्रिप करायचं. खडकाळ पर्वतांचा आनंद घ्यायचा असेल तर लडाखची सहल नक्की करावी.

५. मुन्नार, केरळ

बोट हाउसमध्ये राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर मुन्नार उत्तम पर्याय आहे. मुन्नारमध्ये जगभरातून पर्यटक येतात.

६. रानीखेत

ही एक अशी जागा आहे जिथे ९ गोल्फ कोर्स, ऑर्किड्चे शेत आहेत. तसेच झुला देवी आणि मंकामेश्वर देऊळ आहे.

७. माउंट आबू

राजस्थानमधलं हिल स्टेशन म्हणजे माउंट अबू. राजस्थानचा वैभवपूर्ण इतिहास सांगणारे हे ठिकाण येथील देऊळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेल, तेथील ‘नकी’ तलाव खूप प्रसिद्ध आहे. दिलवाडा देऊळाबरोबरच अनेक रंगीबेरंगी फुलांच्या बागा तुम्हाला इथे पाहायला मिळतील.

८. गंगटोक

सिक्किममध्ये असलेलं गंगटोक अतिशय सुंदर आहे. इथले मोमो खाण्याची मज्जाच वेगळी.

९. दार्जिलिंग

चहा कॉफीचे मळे बघण्यासाठी सर्वोत्कृष्ट जागा दार्जिलिंग. येथील लोकही अगदी प्रेमळ आहेत.

१०. माजुली

आसाम मधलं माजुली एक छोटास पण सुंदर बेट आहे. येथील संस्कृती, साहित्य, कला आणि संगीताचा आयुष्यात एकदा तरी अनुभव घेतला पाहिजे.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.