Now Reading:
स्मार्टफोनवर DSLR स्टाईल डिपी काढण्यासाठी टॉप ५ हॅक
स्मार्टफोनवर DSLR स्टाईल डिपी काढण्यासाठी टॉप ५ हॅक

फेसबुक (Facebook) वर अपलोड करायला नवीन डि. पी. हवाय? पण DSLR नाहीये? फिकर नॉट! आपल्याकडे त्याचाही जुगाड आहे.

फक्त खाली दिलेल्या काही गोष्टी पाळा आणि आपल्या स्मार्टफोनवर काढा झकास फोटो.

१. स्वस्तात मस्त रिफ्लेक्टर्स – 

शे-पाचशे लाईक्स साठी हजार रुपयाचा रिफ्लेक्टर घेणे शहाणपणाचं नाही. पण आपल्याकडे याचा पॉकेट फ्रेंडली तोडगा आहे. निकामी पडलेली थर्मोकोल शीट किंवा व्हाईटबोर्ड रिफ्लेक्टर म्हणून वापरू शकता.

२. DIY Shutter Cable (DIY शटर केबल) – 

ब्लर फोटो म्हणजे डोकेदुखीच! आपण इतरांचे ढिंचॅक फोटो काढावे नि त्यांनी हे असे आऊट ऑफ फोकस, ब्लर काढावेत. पुढच्या वेळी तुमच्या मित्राला हि सोप्पी ट्रिक सांगा. हेडफोन्स फोन ला कनेक्ट करून त्याचा उपयोग शटर केबल सारखा करा. पर्यायी तुम्ही सेल्फटायमर ही वापरू शकता.

३. No Flash (फ्लॅश नको)!

शक्यतो फ्लॅशचा वापर टाळा. दुसऱ्या एखाद्या फोनची फ्लॅशलाईट वापरून किंवा स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात आकर्षक पोट्रेट्स काढता येतात.

४. Rule of the thirds (रुल ऑफ थर्डस) – 

फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे रूल ऑफ थर्डस लक्षात ठेवा. सोप्या भाषेत सांगायचं तर फोटोमधील मुख्य गोष्टी त्या ग्रीडच्या लाईन्स वर असायला हव्यात त्याने फोटो सुबक दिसतो. फोटो काढताना नाही जमलं तरी क्रॉप करताना रूल ऑफ थर्डस लक्षात ठेवा.

५. Rule of spcace (रूल ऑफ स्पेस) – 

फोटो मध्ये मोकळी जागा सोडल्यास फोटोचं सौंदर्य आणखी खुलून येते. आता म्हणाल जागा सोडावी तर कुठे? तर सहसा नजरेसमोरचा भाग मोकळा असावा.

क्लिक, एडिट, अपलोड!

Click, Edit, Upload! 

Input your search keywords and press Enter.