Now Reading:
पालक म्हणून व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन सांभाळणं होतंय अवघड? या सोप्या गोष्टी ठेवा लक्षात
पालक म्हणून व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन सांभाळणं होतंय अवघड? या सोप्या गोष्टी ठेवा लक्षात

पालक आणि मुलांच्या नात्याचं स्वरूप मुलांच्या मनावर परिणाम करतं. आई-वडील जेव्हा कामासाठी दिवसभर घराबाहेर असतात तेव्हा पालक आणि मुलांसाठी ही परिस्थिती खूप अवघड होते. कामाच्या व्यापात मुलांकडे कमी लक्ष दिलं जातं त्यामुळे मुलांच्या मानसिक आणि सामाजिक वर्तणुकीवर परिणाम होतो. व्यावसायिक कामाच्या मागण्यांसोबत एक पालक असण्याची जबाबदारी हाताळताना पालकांनासुद्धा पुष्कळ ताण सोसावा लागतो.

पालकत्व आणि कामात संतुलन राखण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स:

आपल्या जोडीदाराशी संवाद साधा

तुम्हाला मुलांना वेळ द्यावा लागेल, विशेषत: त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळात. तुमच्या जोडीदाराशी मुलाच्या शैक्षणिक आणि अतिरिक्त अभ्यासक्रमातील प्रगतीबदल संवाद ठेवा जेणेकरून तुमच्या मुलाची वाढ तुमच्या लक्षात येईल.

तुमच्या मुलासोबत वेळ घालवा

तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. तुम्ही महिन्यातून एकदा कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. सुट्टीच्या दिवशी कॅरम, कोडी सोडवणे, बॅट- मिंटन सारखे खेळ तुम्ही मुलांसोबत खेळू शकता. याने तुमची मुलं कुटूुबासोबत मौज मजा करायला शिकतील.

ऑफिसच काम घरी आणू नये

ऑफिसचं काम घरी आणल्याने मुलांबरोबर घालवण्याचा वेळ कमी होतो. मुलांना तुमच्याशी संवाद साधायला वेळ द्या. त्यांना जे बोलायचे असेल ते लक्ष देऊन ऐका. जर असं झालं नाही तर त्यांचा आत्मविश्वास खचू शकतो.

दिवसातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवलं पाहिजे

दिवसभर मुलं आणि पालक घराबाहेर असतात. तुम्हाला फक्त रात्रीचा वेळ कुटुंबासोबत एकत्र मिळत असेल तो वेळ पुरेपूर वापरा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.