Now Reading:
डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या कार्याचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान

डॉ. अभय आणि राणी बंग गेल्या ३० वर्षांपासून गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवा देण्याचे काम करत आहे. बंग जोडप्याने गडचिरोलीच्या या आदिवासी भागात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य सुरु केले. नुकतेच भारत सरकाराने महाराष्ट्रातील डॉ. अभय बंग, राणी बंग यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी ‘पद्मश्री’या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले.

डॉ. राणी व डॉ. अभय यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण नागपूर येथे सुवर्णपदकासह पूर्ण केल्यानंतर आरोग्या समस्या सोडविण्यासाठी सहा वर्षे ग्रामीण भागात जाऊन काम केले. सार्वजनिक आरोग्यसेवा परिणामकारकरीत्या कशी करावी, हे शिकवण्यासाठी त्यांनी फोर्ड फेलोशिप अंतर्गत १९८३ साली अमेरिकेत जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात एमपीएचचे शिक्षण घेतले. येथे त्यांना डॉ.डोनाल्ड हेंडरसन व डॉ. कार्ल टेलर हे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील दोन दिग्गज गुरू म्हणून लाभले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गडचिरोलीतील स्त्रिया व आदिवासींचे आरोग्य, दारू व तंबाखूचे व्यसन, तसेच बालमृत्यू हे प्रश्न सोडविण्यासाठी केला. 

आदिवासी भागातील स्त्रियांचे बाळंतपण करण्याच्या पारंपरिक पद्धतीने अनेक बालकांना जीव गमवावा लागला. या भागातील लोकांना योग्य उपचार आणि आरोग्यसेवेबद्दल समजावून सांगणे हे मोठे जिकरीचे काम होते. डॉ.राणी बंग या स्त्री व बालरोगतज्ज्ञ असल्याने त्यांना या पद्धती पटत नव्हत्या. पण त्या बाळंतपण करणाऱ्या सुईणींच्या विरोधात जाऊ शकत नव्हत्या. त्यांनी या समाजातील स्त्रियांच्या बाळंतपणाच्या सगळ्या पद्धती शिकून घेतल्या व त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन नवजात बालकांचे मृत्यू रोखण्याचा प्रयत्न केला.

या समाजातील अनेक स्त्रिया रोजगारीवर काम करतात. त्यामुळे आपल्या मुलांची योग्य काळजी घेणे, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे त्यांना जमत नाही. मुलांना आणि गरोदर स्त्रियांना निरोगी आरोग्याविषयी जागृत करण्याचे काम बंग दामपत्याने केले.

डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अॅण्ड रिसर्चची स्थापना केली. त्याच माध्यमातून त्यांनी आरोग्यसेवेतील एक उत्तम उदाहरण लोकांसमोर मांडले. भारतातील प्रगत आरोग्य सेवेचे ते शिल्पकार समजले जातात.

गडचिरोली हा भाग वेश्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या महिलांच्या भविष्यासाठी देखील डॉ.राणी बंग यांनी कार्य केले. केवळ आरोग्यसेवे पुरते मर्यादित न राहता त्यांनी या भागातील लोकांच्या विकासासाठी कार्य केले.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.