Now Reading:
ओए काके! तरुणांनो ‘या’ मुलाप्रमाणे तुम्हीही करू शकता कमाई
ओए काके! तरुणांनो ‘या’ मुलाप्रमाणे तुम्हीही करू शकता कमाई

स्टार्टअप करायचंय, स्टार्टअप करायचंय असं प्रत्येकाच्या मनात असतं. पण नेमकी कुठून सुरुवात करायची इथेच गाडी अडकलेली असते. आयडिया तर सगळ्यांकडे पोतंभर असतात पण बऱ्याचदा परफेक्शनचा मागोवा घेण्याच्या नादात त्यांची गाडी कधी स्टेशन सोडतच नाही. अशाच खोळंबलेल्या तरूणांसाठी आहे ही आजची प्रेरणादायी कथा, कानपूरमधील ‘ओए काके’ या स्टार्टअपची.

शिक्षणासाठी परदेशी

कानपूरमधील निशित गुप्ता या तरुणाने सुरु केलेलं ‘ओए काके’ या स्टार्टअपचे चर्चे आजकाल सगळीकडेच आहेत. कानपूरच्या सिव्हिल लाइन भागात राहणारा हा तरुण बारावीनंतर शिक्षणासाठी मुंबईला आला. मुंबईमधील NMIMS युनिव्हर्सिटी मधून बीकॉममध्ये प्रवेश मिळवला. तिथे एक वर्ष घालवल्यावर SIM मधून बीएससी इन इकॉनॉमिक्स झाल्यावर उच्च शिक्षणासाठी सिंगापूरला गेला.

आयडियाची कल्पना 

तिथे निश्चितच मन काही रमेना म्हणून तो भारतात परत आला आणि तेल-साबणाची घरपोच डिलिव्हरी करू लागला. हे करत असताना त्याला कानपूरमधील दिवसांची आठवण होत असे. तिथे कशी कामं सहज पूर्ण होत. हवी ती गोष्ट चटकन मिळत असे. अशा सुविधा बाजारात सहसा दिसून येत नाहीत. हा विचार वारंवार त्याच्या मनात घोळत होता. त्याे आपल्या डोक्यातील कल्पना त्याचे मित्र रितेश व आयुष यांच्यासमोर मांडली. तिघांनी मिळून यावर आपलं डोकं चालवलं नि २०१५ मध्ये ‘ओये काके डॉट कॉम’ (oyekake.com) या नावाने वेबसाइट सुरु केली.

घरपोच जेवण

तिघं लोकांच्या आवडीप्रमाणे जेवणाच्या घरपोच डिलिव्हरी करण्यावर लक्ष केंद्रीत करु लागले. दिवसभरात त्यांना साठ-सत्तर ऑर्डर येत. निश्चितचं त्यांचं मत होतं की, कोणताही व्यवसाय कल्पकता आणि मेहनतीने यशस्वी होतो. कानपूरमध्ये येणाऱ्या लोकांना त्यांची इच्छा नसतानाही इथल्या हॉटेलमध्ये जेवायला लागायचे हे त्याच्या लक्षात आलं. जर त्यांना घरचं जेवण मिळालं तर लोक आवडीने खातील हा विचार त्यांच्या स्टार्टअपच्या केंद्रस्थानी होता.

आज त्यांच्या कंपनीमध्ये जवळपास पंचवीस जण काम करतात. ते ऑर्डरनुसार शहरातील कानाकोपऱ्यात जेवण पोहचवतात. तसेच अंतरानुसार सर्व्हिस चार्ज घेतात.

साधा सरळ मंत्र

यांच्या स्टार्टअपमधून बरंच काही शिकण्यासारखं आहे. कसं त्यांनी स्थानिक समस्यांतून आपलं स्टार्टअप उभं केलं. यांच्यासारखंच वेबसाइटच्या माध्यमातून डिलिव्हरी यंत्रणा सुरु केली जाऊ शकते. कारण आजकाल लोकांना दुकानात जायला वेळ नसतो, सर्व काही दारात हवं असतं. म्हणूनच ऑनलाइन डिलिव्हरी यंत्रणा एक उत्तम व्यवसायाचा पर्याय आहे.

News Source: YourStory

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.