Now Reading:
नैसर्गिकरित्या भुवया जाड करण्यासाठी ४ घरगुती उपाय
नैसर्गिकरित्या भुवया जाड करण्यासाठी ४ घरगुती उपाय

विचार करा आपल्याला जर भुवया नसत्या तर आपण कसे दिसलो असतो? याचा विचार करून पण हसू येतं ना? म्हणून स्त्रिया नेहमीच त्यांच्या भुवया सुंदर दिसाव्यात यासाठी काळजी घेत असतात. सध्याच्या काळात दाट भुवयांचा ट्रेंड चालू आहे. जर तुम्हला पण या ट्रेंडनुसार तुमच्या भुवया दाट करायच्या असतील तर त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

१. ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये अ आणि इ जीवनसत्व असतं जे केसांच्या वाढेसाठी उपयोगी असतं. याचे दोन ते तीन थेम्ब भुवयांवर लावून मसाज करा.

२. खोबरेल तेल

केसांसाठी खोरेल तेल उपयोगी असतं हे काही वेगळं सांगायला नको. हे तेल रात्री झोपायच्या आधी भुवयांवर लावा.

३. बदामाचं तेल

बदामाच्या तेलाने त्वचा मऊ होते. भुवयांवर तेल लावून जरा वेळ मसाज केल्याने त्यांची वाढ होण्यास मदत होते.

४. एरंडेल तेल

एरंडेल तेलात जीवनसत्व आणि फॅटी अॅसिड असतात जे केसांना मजबूत बनवतात. बाजारात मिळणाऱ्या एरंडेल तेलाने कधी कधी त्वचेला त्रास होऊ शकतो त्यामुळे चांगल्या प्रतीचं तेल वापरा.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.