Now Reading:
ओबामा म्हणतात, ‘लग्न करण्यापूर्वी स्वतःला विचारा हे ३ प्रश्न’
ओबामा म्हणतात, ‘लग्न करण्यापूर्वी स्वतःला विचारा हे ३ प्रश्न’

अमेरिकेचे ४४ वे राष्ट्रपती बराक ओबामा एखादा सल्ला देतात, तेव्हा संपूर्ण जग त्यांच्या बोलण्याकडे कान टवकारुन लक्ष देते. ते फक्त एक उत्तम राजकीय नेते नाहीत, तर एक जबाबदार पती आणि तितकेच दक्ष पालकसुद्धा आहेत. जगातील सर्वात सामर्थ्यशाली देशांपैकी एका देशाचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने जगातील सगळे चढउतार पाहिले असतील यात शंकाच नाही.

ओबामा यांचे तत्कालीन प्रमुख सल्लागार डॅन फायफर (Dan Pfeiffer) यांनी आपल्या पुस्तकामध्ये बराक ओबामा यांसोबत घालवलेल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या क्षणाचा खुलासा केला. डॅन तेव्हा विवाहबंधनामध्ये अडकण्याच्या विचारात होते. याबाबत ओबामा यांच्याशी चर्चा करत असताना ओबामांनी त्यांना हे तीन प्रश्न विचारले.

१. तुम्हाला ती व्यक्ती रंजक वाटते का?

तुम्ही या व्यक्तीसोबत आपल्या आयुष्याचा सर्वात जास्त वेळ घालवणार. त्यांच्यासोबत दिवसातील प्रत्येक मिनिट आणि घटना एकमेकांना सांगणार. तुम्हाला खरंच वाटते की, यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखामध्ये भागिदार होणे तुम्हाला आवडेल?

२. तुम्ही त्यांच्यासोबत असताना दिलखुलासपणे हसता का?

योग्य जोडीदारासोबत सर्व काही सहज वाटते. त्यांच्या लहानसहान गोष्टी आपणांस चटकन हसवतात. कोणत्याही नात्याच्या मुळाशी जोडप्याची विनोदबुद्धी जुळणे गरजेचे असते.

३. ती व्यक्ती एक चांगला पालक होऊ शकते का?

लग्नाचा निर्णय घेताना फक्त एकमेकांची सोबत चांगली वाटणे ही एवढीच गरज नसते. तर पुढे येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठीही आपण तयार असायला हवे. लग्न म्हटले की, कालांतराने कुटुंबाचा विचार हा आलाच. म्हणून आपण पालक या नात्याच्या चौकटीमध्ये कुठे बसतो हे पण माहित असणे आवश्यक आहे.

ओबामांना नकार देण्याची छाती बड्या बड्यांना होत नाही. आता त्यांचे ऐकून आपण तरी या प्रश्नांवर विचार करा आणि या तीनही प्रश्नांचे उत्तर ‘हो’ असेल; तर थोडी आणखी हिंमत करा आणि आपल्या जोडीदारास लग्नासाठी विचारा.

All images taken from POTUS 44 Facebook page

Input your search keywords and press Enter.