Now Reading:
पैसा आणि तुम्ही : ३ सोप्या टप्प्यात तुमच्या दारात उभं करा पैशाचं झाड
पैसा आणि तुम्ही : ३ सोप्या टप्प्यात तुमच्या दारात उभं करा पैशाचं झाड

‘पैसे झाडावर लागत नाहीत’ हे मान्य पण, जर तुम्हाला पैसे वाचवायचे आहेत तर एक आयडिया आहे. समजा पैसा म्हणजे एक झाड आहे आणि या पैशाचं झाड तुम्ही ३ सोप्या नियमांनी फुलवू शकता.

१. पैशाचं संगोपन करा-

मान्य आहे तुमच्याकडे पैशाचा वटवृक्ष नाही. पण काहीतरी असेलच ना बियाण्याच्या स्वरूपात? तेच बियाणं रुजवा. त्या पैशाचं संगोपन करा, बचत करा. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका. उगाचच कर्ज-हफ्त्यांचं ओझं लादून घेऊ नका. मासिक खर्चाचं बजेट जमेल तितकं ते आटोक्यात आणा.

२. पैशाची वाढ करा-

आता तुमच्या पैशाच्या बीला कोंब आलाय, त्याचं रोप झालंय. आता त्याला वाढीची गरज आहे. त्याला खतपाणी घाला. छोट्या मोठ्या गुंतवणुकी करा. गरज नसताना जोखीम घेऊ नका. रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. फायदा होतोय की नाही, नुकसान होत असेल तर शक्यतो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

३. पैशाची राखण करा-

finance lessons ganesha

आता तुमचं पैशाचं झाड उभं झालंय. आता या धनराशीचे संरक्षण ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. अपघात कधी व कसा घडेल सांगता येत नसतो. कुठे नुकसान भोगावं लागेल याचा नेम नाही म्हणून विमा योजना, टॅक्स योजना, आरोग्य विमा आदी तरतुदी करून ठेवाव्यात जेणेकरून ऐन वेळी जर खर्च तोंडावर आला तर कुटुंबावर त्याचा ताण येऊ नये. याप्रकारे तुम्ही तुमचं पैशाचं झाड सुरक्षित ठेवू शकता. तसेच तुमच्यानंतरही तुमच्या पैशाची योग्य तरतूद केल्यास कुटुंबास एक आधार मिळतो.

Input your search keywords and press Enter.