Now Reading:
सलाम ! रुग्णांसाठी मगरींची नदी पार करणारी सेवाभावी नर्स
सलाम ! रुग्णांसाठी मगरींची नदी पार करणारी सेवाभावी नर्स

छत्तीसगढच्या सुनीता ठाकूर गेल्या ७ वर्षांपासून दररोज एक अशी नदी पार करता ज्यात खूप मगरी आहेत. आणि हे सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाज सेवेसाठी. आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी दररोज मगरींची नदी ओलांडणाऱ्या या नर्सविषयी.

सुनीता ठाकूर दररोज इंद्रावती नदी पार करून नक्षलवादी भागात असलेल्या दांतेवाडी पर्यंत प्रवास करतात. तिथल्या महिलांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून त्या मगरींनी भरलेली नदी ओलांडून जातात. एवढंच नाही तर नदी ओलांडल्यावर चार्लपाल गावात पोहोचण्यासाठी त्या नक्षली हिट भागातील आतल्या बाजूने प्रवास करतात.

त्यांची ही निर्भयी सेवा गरोदर महिलांना अतिशय उपयोगी ठरते. त्यांचा सामना जरी कोणत्या जंगली प्राण्यांसोबत झाला तरीही त्या त्यांच्या कामापासून दूर पळत नाहीत. अनेक वर्षांपासून त्या स्वतःचं आयुष्याला धोक्यात घालत आहेत, परंतु यामुळे त्यांच्या मनात कधीही काम सोडण्याची कल्पनासुद्धा डोकावली नाही. एका मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की, कितीही संकटे आली तरीही त्या कामापासून मागे हटणार नाहीत. त्यांना रोज नदी पार करून ८-१० किलोमीटर घनदाट जंगलातून जावं लागतं असलं तरी त्यांना त्यांचे काम प्रिय आहे. एकदा तर नक्षलवाद्यांनी त्यांना पकडलं होतं.

त्यांच्या शूर आणि निःस्वार्थी कार्याची प्रशंसा सरकारनेही केली असून त्यासाठी त्यांना बक्षिसही मिळाले. त्यांच्या मेहनतीकडे बघून सरकारने नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

 Cover Image Source: ANI

Input your search keywords and press Enter.