Now Reading:
किचन कॉर्नर: नवरत्न कुर्मा
किचन कॉर्नर: नवरत्न कुर्मा

नवरत्न कुर्मा एक शाही मुघलाई पदार्थ आहे. दिसायला नाव जरी शाही असलं तरी अगदी सहजपणे तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आणि चवीला तर नाव घेतलं तरी तोंडावर पाणी सुटेल अशी!

 

साहित्य-

३ कांदे

२ टोमॅटो

७-८ लसूण पाकळ्या

१/२ इंच आलं

१/२ टीस्पून जिरं

२ टेबलस्पून तेल

१ टेबलस्पून काजू

१ टेबलस्पून मनुका

१ टेबलस्पून कोथिंबीर

१ टेबलस्पून मिक्स मसाला

१ टीस्पून किचन किंग मसाला

१ टेबलस्पून बटर

१ मोसंबी

१ कप मिक्स भाज्या (मटार, गाजर, फ्लावर, शिमला मिरची)

कडीपत्ता

किसलेला पनीर

पाणी

चवीनुसार मीठ

 

कृती-

१. ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम कांदे, टोमॅटो, आलं-लसूण, मनुका, काजू, कोथिंबीर यापासून मसाला पेस्ट तयार करा. ही पेस्ट बाजूला ठेवा.

२. पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे तडकू द्या.

३. त्यानंतर मसाला पेस्ट घाला व १० मिनिटांसाठी ढवळा.

४. त्या मिश्रणात किचन किंग मसाला, काजू, मनुका व बटर घाला व व्यवस्थित ढवळून घ्या.

५. त्यात अर्धवट शिजवलेल्या भाज्या व मीठ घाला.

६. पाणी घाला व व्यवस्थित ढवळून घ्या.

७. त्यात मोसंबीचे तुकडे घाला.

८. झाकण लावा आणि ग्रेव्ही २० मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवा.

९. वरून बटर व कडीपत्ता घाला आणि गॅस बंद करा.

१०. त्यानंतर मोसंबीचे तुकडे आणि किसलेला पनीर टाकून तुमची डीश सजवा.

११. रोटी किंवा नानसोबत गरमागरम कुर्मा तुम्ही खाऊ शकता.

 

आणखी नीट समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.

Input your search keywords and press Enter.