Now Reading:
केस गळती थांबवण्यासाठी व केस मजबूत करण्यासाठी नैसर्गिक उपचार
केस गळती थांबवण्यासाठी व केस मजबूत करण्यासाठी नैसर्गिक उपचार

केस गळण्याचा त्रास स्त्री आणि पुरुष दोघांना सहन करावा लागतो. केस गळण्याची कारणं काहीही असो, पण यावर नैसर्गिक उपाय आहेत.

व्यवस्थित आहार-

तुमच्या आहाराकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. पौष्टिक खाणं अधिक असू द्या आणि दारू व इतर व्यसने टाळा. हिरव्या भाज्या, धान्य, फळे, तुमच्या केसाच्या वाढीसाठी गरजेची आहे. दररोज डाळ आणि इतर दाणे आहारात घेतल्याने केस गळणार नाहीत.  

पाणी-

शरीरात अॅसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी सतत पाणी पित राहा. दिवसातून कमीत कमी १२ ग्लास पाणी तरी प्यायला हवं. 

हिना-

देशात लोकप्रिय असा हिना केसांच्या मऊपणासाठी तर वापरलाच जातो, पण केस गळती वर पण हिना गुणकारी आहे. अंड्यात शिखेकाई किंवा आवळा घालून मिश्रण करावे आणि ते केसांवर लावावं. 

तेल-

नारळाच्या तेलाने केसांना मसाज (Massage) करणे भारतात सगळीकडेच केले जाते. केसांच्या मुळांना आणि टाळूवर तेल घासल्याने ते मजबूत होतात. 

कांदा आणि लसूण-

कांदा आणि लसूण टाळूवर घासल्याने केस कमकुवत होत नाहीत. डोक्यात जर बॅक्टेरिया जमा झाले असतील तर ते पण निघून जातील. 

 

 

Input your search keywords and press Enter.