Now Reading:
नारळ पाणी प्यायलाने कमी होतं वजन; असेच ६ गुणकारी फायदे जे तुम्हाला ठाऊकही नसतील
नारळ पाणी प्यायलाने कमी होतं वजन; असेच ६ गुणकारी फायदे जे तुम्हाला ठाऊकही नसतील

तुमच्या गावात सहज उपलब्ध होणाऱ्या नारळाचं पाणी चवीला गोड असतंच, पण उत्तम आरोग्यासाठीसुद्धा हा योग्य पर्याय आहे. नारळ पाणी नियमित प्यायलं तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात. हे नेमके कोणते फायदे आहेत, हे पाहूया.

त्वचेवरील डाग घालवा

Image Source: Shutterstock

नारळाच्या पाण्यातील काही घटक त्वचेला वेगवेगळ्या जंतूंपासून दूर ठेवतात. त्वचेवरील डाग तुमच्या सुंदर दिसण्याच्या आड येत असतील तर तुम्ही नारळाचं पाणी प्यायला सुरुवात करायला हवं. 

Blood Pressure (रक्त दाब)

Image Source: Wikimedia

कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर दररोज नारळ पाणी प्यायला हवं. नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब संतुलित ठेवणं सहज शक्य होतं. त्यामुळे रक्त आणि त्यापासून सुरु होणारे इतर आजारही दूर राहतात. 

Stops Headache (डोकेदुखी थांबवते)

Image Source: Shutterstock

नारळाच्या पाण्यातील मॅग्नेशिअम डोकेदुखीचा त्रास कमी करते. त्यामुळे डोकं दुखायला लागलं की एक ग्लास नारळाचे पाणी प्यायला हरकत नाही.

केसांची वाढ होण्यास मदत

केसांची वाढ उत्तम होण्यासाठी नारळ पाणी हा उत्तम पर्याय आहे. म्हणूनच नारळाचे तेल केसांना लावले जाते. त्यामुळे केसांची वाढ तर होतेच, शिवाय केसांना तेजही येते. केसांना लांब आणि मजबूत बनवते.

Diabetes (मधुमेह) इलाज 

नारळाच्या पाण्यात साखरेचे प्रमाण कमी असते, तर पोटॅशियम आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह झालेल्या लोकांना नारळाचं पाणी कधीही दिलेलं उत्तमच. 

Weight Loss (वजन कमी) करण्यासाठी

वजन कमी करायचं म्हणून वेगवेगळे उपाय करत आहात. थांबा, नारळाचं पाणी प्या आणि बारीक व्हा. नारळाचं पाणी पचन क्रिया वाढवतं आणि शरीरात चरबी साठणं बंद होतं. 

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.