Now Reading:
रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या मुलांना मिळतंय मोफत शिक्षण
रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या मुलांना मिळतंय मोफत शिक्षण

भलाईचा जमाना नाही राहिला. कलयुग आलंय कलयुग! असं सर्रास ऐकायला मिळतं. पण आजच्या स्वार्थाने बटबटलेल्या जगात जेव्हा कोणी प्रामाणिक माणूस भेटतो तेव्हा माणूसकी अस्तित्वात आहे यावर विश्वास कायम राहतो. अशीच एक घटना समोर आली आहे.

मुंबईमधील चेंबूर येथे राहणाऱ्या अरुणोदय इंग्लिश शाळेच्या संचालिका सरला नंबूदिरी यांसाठी २१ डिसेंबरचा दिवस सर्वसामान्य दिवसासारखा होता. नेहमीप्रमाणे त्यांनी शाळेच्या इमारतीपासून काही अंतरावर गाडी उभी केली. त्यांच्या पायाला दुखापत झाल्याने चालण्यास त्रास होत होता. म्हणून दुपारी ३च्या सुमारास घरी परतताना त्यांनी शाळेपासून गाडीपर्यंत रिक्षा करण्याचे ठरवले. ती रिक्षा होती अमित गुप्ता यांची.

बॅग झाली गहाळ

गाडीतून उतरल्यावर काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की, त्या बॅग रिक्षेतच विसरल्यात. नेमकं त्या दिवशी त्यांच्या बॅगेत ८० हजार रोख, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वाहन चालक परवाना, गाडीची कागदपत्रे, दोन मोबाइल फोन, घरच्या चाव्या तसेच लॉकरच्या चाव्याही होत्या. त्या एकदम गांगरूनच गेल्या.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘मी घरी एकटी राहते. दुसऱ्या दिवशी शाळासुद्धा बंद होती. थोड्या वेळासाठी काय करू आणि काय नाही ते मला सुचेनाच. मी लागलीच शाळेतील शिपायाला फोन केला व ती रिक्षा दिसतेय का ते पाहण्यास सांगितले. शिपायाने मुख्य रस्त्यावरील पानवाल्यास गाठले. पानवाल्याने सांगितले की तो तिथेच थांबला होता. त्याचे नाव अमित गुप्ता आहे.’

..आणि अनपेक्षित घडलं

फक्त नावाच्या माहितीवर मुंबईच्या महासागरात एका व्यक्तीस शोधणे म्हणजे जवळजवळ अशक्यच! त्यांनी लगेच पोलीस चौकी गाठण्याचा विचार केला. कारण अर्ध्या तासाच्या आत त्यांची पर्स त्यांना सर्व सामान आणि पैश्यासकट होती तशा अवस्थेत परत मिळेल असा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता.

झालं असं की, सरलाजी उतरल्यानंतर दुसरे प्रवासी रिक्षात येऊन बसले. त्यांनी लगेच ती बेवारस बॅग अमितच्या निदर्शनास आणली. त्याच्या चटकन लक्षात आलं की, ही बॅग सरलाजींची असणार. त्याने थेट शाळा गाठली व त्यांना त्यांची बॅग सुपूर्त केली.

Input your search keywords and press Enter.