Now Reading:
राजस्थानच्या भरतपूर गावातील २४ वर्षीय शिक्षित महिला सरपंच
राजस्थानच्या भरतपूर गावातील २४ वर्षीय शिक्षित महिला सरपंच

भारतीय ग्रामीण स्त्रियांनी सामाजिकदृष्ट्या काहीच हातभार लावला नाही असा गैरसमज लोकांच्या मनात असू शकतो. पण, या गैरसमजाचा समूळ नाश करतेय राजस्थानच्या भरतपूर गावातील शाहनाज खान. ही २४ वर्षीय एमबीबीएसची विद्यार्थिनी भरतपूरमध्ये सरपंच झाली आहे. ती फक्त एक महिला सरपंच नसून एक सुशिक्षित सरपंच आहे.


शाहनाज हिचा गुडगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करण्याचा विचार आहे. परंतु, शिक्षणाबरोबरच राजकीय कार्यही ती हाताळू शकते असा तिला विश्वास आहे. तसेच, गावात जनजागृती करण्याचेही तिचे ध्येय आहे. ती म्हणते की, ‘येथे लोक ट्युबरक्युलॉसिसमुळे मरण पावतात. हा रोग ६ महिन्याच्या कालावधीत बरा केला जाऊ शकतो. पण लोकांना याबाबत माहिती नाही आहे.’

एका मुलाखतीत त्या म्हणाली की, ‘मेवातचे लोक त्यांच्या मुलींना शिक्षणाची संधी देत नाहीत. मी स्वत: एक उदाहरण म्हणून त्यांच्या समोर उभी राहीन आणि दाखवून देईन की शिक्षण एका मुलीच आयुष्य कसं सुधारू शकतं.’


शाहनाज तिच्या कार्याने केवळ तिच्या कुटुंबाची मान अभिमानाने उंचावत नाहीये तर तिच्या आजोबांचा वारसाही ती पुढे नेतेय. तसेच, ती इतिहास घडवून आपल्या देशातील स्त्रियांना प्रेरणाही देतेय.

Cover Image Source: Hindustan Times

Input your search keywords and press Enter.