Now Reading:
शेतीसाठी कर्ज कसं काढावं?
शेतीसाठी कर्ज कसं काढावं?
money saving

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पण, अनेकदा अपूरा पाऊस किंवा शेतीसाठी लागणारा हवा तितका पैसा नसल्याने शेतकरी दादा आत्महत्या करतो. पाऊस हा निसर्गाची देणगी आहे त्यामुळे आपण निसर्गाची काळजी घेतली तर पाऊसही उत्तम आणि व्यवस्थित पडेल. दुसरी समस्या ती म्हणजे पैशांची. आपल्याकडे शेती व्यवसायासाठी हवे असलेले पैसे नाहीत, म्हणून काळजी करण्याचं कारण नाही. अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी शेती कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. या कर्जाचा लाभ घेत पाण्याचा पंप, बी बियाणे आणि इतर गोष्टींसाठी लागणारे कर्ज तुम्ही काढू शकता. कसं ते बघूया.

सवलतीच्या व्याज दरात कर्ज

तुमच्याकडे शेती आहे. मात्र शेतीसाठी लागणार्‍या गरजेच्या विविध गोष्टी नाहीत, तर चिंता करण्याची गरज नाही. कोणाकडे कर्ज मागायला जायची गरज नाही. अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी शेतकर्‍यांसाठी विशेष सवलतीच्या व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिलं आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना या कर्जाची रक्कम परत करणं शक्य होईल. काही बँकांमध्ये तर शेतकर्‍यांना कर्ज देण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. विविध कागदपत्र आणि कर्जासाठी असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माणसं नेमण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्ज काढणं सहज सोपं झालं आहे.

बँक कर्मचाऱ्यांची मोलाची मदत

शेतकर्‍यांना कर्ज देताना ही संपूर्ण प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून बँकेचे कर्मचारी स्वत: घरी येऊन सर्व कागदपत्र आणि प्रक्रिया पूर्ण करतात. तुमचं शेत किती मोठं आहे, कोणत्या प्रकारची शेती तुम्ही घेता, कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला कर्जाची गरज आहे, कर्जाची रक्कम तुम्ही परत करू शकतात की नाही, हे पाहून तुम्हाला कर्ज दिले जाते. व्याजाचं प्रमाणही या गोष्टी पाहून ठरवलं जातं. शेतकर्‍यांसाठी कर्जामध्ये विशेष सवलती असून, त्याची माहितीही या वेळी दिली जाते. त्यामुळे कर्ज काढणं हे आता सहज सोपं झालं आहे.

Cover Image Source: Pixabay

Input your search keywords and press Enter.