Now Reading:
गर्भवती महिलांना सूचना: फर्निचर आणि सौंदर्यप्रसाधनांनी होऊ शकतो बाळाच्या मेंदूवर परिणाम
गर्भवती महिलांना सूचना: फर्निचर आणि सौंदर्यप्रसाधनांनी होऊ शकतो बाळाच्या मेंदूवर परिणाम
makeup kit affects pregnancy

गरोदरपणात स्त्रीला अनेक गोष्टींची काळजी घेण्यास सांगण्यात येते. पण आता असे काही समोर आले आहे ज्यामुळे अनेकजणींना धक्का बसू शकतो. एका नवीन अभ्यासानुसार, गर्भवती महिलांना फर्निचर, ड्रग्स, कॉस्मेटिक्स आणि प्लॅस्टिकमध्ये आढळले जाणारे विषारी पदार्थ यांमुळे सामान्य थायरॉईड-हार्मोनचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे पोटात वाढणाऱ्या मुलाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.

गर्भवती महिलांना सामान्य थायरॉईड-हार्मोनलचा त्रास झाल्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होतो, असं संशोधकांना आढळलं आहे. पूर्वीच्या एका अभ्यासात संशोधकांना असं समजलं की, प्लास्टिक पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे रसायन आणि त्याच बरोबर अन्न आणि पेयांमध्ये वापरले जाणारे रासायनिक प्रथिने याचा त्रास गर्भधारणेदरम्यान आईकडून तिच्या पोटातील मुलांना होऊ शकतो.

बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आईच्या शरीराला थायरॉइड संप्रेरकाची (टी.एच) आवश्यकता असते. पण यात जरा पण वर खाली झालं तर गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या मेंदूच्या वाढेवर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. संशोधकांनी पुढे असंही म्हटलं आहे की, ही थायरॉईड-विघटित रसायने प्रत्येक मनुष्याच्या शरीरात असतात. वयस्कर माणसं, मुलं असो किंवा गर्भवती स्त्रिया सगळ्याचं मानवांच्या शरीरात ही रसायने असतात. तसेच, तुम्ही ज्या ब्रॅण्डचे कॉस्मेटिक्स म्हणजेच सौंदर्यप्रसाधने वापरता ती पडताळून पाहा आणि मगच त्वचेवर लावा. डॉक्टरांनी या गोष्टीची अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

Cover Image Source: Pixabay

Input your search keywords and press Enter.