Now Reading:
रोजच्या गडबडीत मातांचे आयुष्य सोपे करणारे उपाय
रोजच्या गडबडीत मातांचे आयुष्य सोपे करणारे उपाय

घरात आईच्या खांद्यावर बऱ्याच कामांचं ओझं असतं, हे प्रत्येकाने मान्य केलंच पाहिजे. मग ती स्त्री गृहिणी असो किंवा ऑफिसला जाणारी. आम्ही अश्याच मातांसाठी काही युक्त्या आणल्या आहेत ज्याने तुमच्या रोजच्या कामात मदत होईल.  

 

१. फ्रिज (Freeze) केलेलं सँडविचेस-

रोज सकाळी, कामाच्या गडबडीत पदार्थ तयार करून ते पॅक ( Pack ) करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे आदल्या दिवशी सँडविचेस बनवून ते फ्रिज करून ठेवावे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी फक्त ते डब्यात भरण्याचे काम राहील.  

 

२. वेग  वेगळ्या चाकूंचा बरोबर वापर करणे-

वेळ वेगळ्या प्रकारचे चाकू विविध गोष्टी कापण्यासाठी वापरतात. ते शिकून घेतल्याने तुमचा स्वयंपाक करताना वेळ वाचू शकतो.   

 

३. पावलांचे छाप-

मुलांना सोबत घेऊन खरेदी करणं कधी कधी त्रासदायक होऊ शकत. पण त्यांच्यासाठी चपला घ्यायची असतील तर त्यांना सोबत नेणे गरजेचे आहेच. पण हेसुद्धा तुम्ही टाळू शकता. एका पानावर त्यांच्या पायांचे छाप उमटवून घ्या आणि त्या नुसार चप्पल शोधा. अगदी सोपं आहे ना. 

 

४. फ्रिज मॅट्स (Fridge Mats)-

कधी कधी फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न पातेल्यांतून गळतं, आणि पदार्थ ठेवण्याची जागा गुळगुळीत आणि खराब होते. हेच टाळण्यासाठी तुम्ही फ्रिज मॅट्सचा वापर करु शकता. भांड्यांच्या खाली हे मॅट्स ठेऊन द्या. हे साफ करायला पण सोप्पे आहे.

Input your search keywords and press Enter.