Now Reading:
मोदी सरकारने महिलांसाठी राबवलेल्या ६ जीवनावश्यक योजना
मोदी सरकारने महिलांसाठी राबवलेल्या ६ जीवनावश्यक योजना
Modi government schemes

महिलांना समाजात समान वागणूक मिळावी, त्यांच्या पंखांना नवे आभाळ उपलब्ध व्हावे त्यासाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने महिलांकरिता उपक्रम राबविले आहेत. जाणून घ्या काय आहेत या योजना

१. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना-

जानेवारी २०१५ मध्ये स्त्रीभ्रूण हत्येवर आळा बसवण्याच्या हेतूने ही योजना आखण्यात आली. ही योजना देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १०० जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. 

२. वन स्टॉप सेंटर स्किम-

Modi government schemes

वन स्टॉप सेंटर देशातील महिला ज्या लैंगिक शोषण, शारीरिक, भावनिक, मानसिक, आर्थिक जाचाला बळी पडतायत त्यांना आधार द्यायचे काम करतात.

३. महिला हेल्पलाइन योजना-

ही योजना महिलांवर होणाऱ्या हिंसक अत्याचारांविरुद्ध २४ तासांच्या आत तात्काळ मदत पुरवते. या योजनेची सुरवात १ एप्रिल २०१५ रोजी महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे करण्यात आली.

४. प्रधानमंत्री उज्वला योजना-

Modi government schemes

या योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखाली महिलांना मोफत LPG गॅस पुरवठा करण्यात येत आहे. तसेच दर घरामागे १६०० रुपयांची मदत ही पुरवली जातेय.

५. स्वधार गृह इनिशिएटीव्ह-

या योजनेअंतर्गत संकटात असलेल्या महिलांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्याशी निगडित सुविधा तसेच त्यांना आर्थिक व सामाजिक स्थिरता देण्यासाठी कार्य केले जाते.

६. महिला ई हाट-

महिला व बाल विकास मंत्रालयाने ७ मार्च, २०१६ रोजी महिला ई हाट ही द्विभाषिक योजना सुरु केली, ज्यात महिलांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. जेणेकरून महिला उद्योजक तसेच संस्थांना प्रोत्साहन देता येईल.

Input your search keywords and press Enter.