Now Reading:
रेसिपी : मैदा, तेलाशिवाय बनवा ‘हेल्दी समोसा’
रेसिपी : मैदा, तेलाशिवाय बनवा ‘हेल्दी समोसा’

भारतीय लोकांमध्ये समोसा हा आवडीचा पदार्थ मानला जातो. पण समोसा बनवण्यासाठी जो मैदा, तेल वापरलं जातं ते शरीरासाठी धोकाकायक असतं. या समोश्यामुळे शरीरातील चरबीच्या समस्या वाढून हृदयावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय समोश्याची रेसिपी ज्यात तुम्हाला मैदा किंवा तेलाचा वापर करावा लागणार नाही.

साहित्य:

१ चमचा जिरं, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ चमचा बडीशेप, १ चमचा तेल/तूप, अर्धा वाटी मटार, २ वाफवलेले बटाटे, अर्धा चमचा आमचूर पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, वीट ब्रेड (गव्हापासून तयार करण्यात आलेले ब्रेड)

कृती:

समोसाचे सारण-

१. एका गरम पॅनमध्ये १ चमचा तेल/ तूप तापवा. त्यांनतर प्रत्येकी १ चमचा जिरं, बडीशेप आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी.

२. मग त्यात अर्धी वाटी मटार, २ वाफवून कापलेले बटाटे टाकावे.

३. मटार आणि बटाटे शिजत आले की वरून आमचूर पावडर, थोडी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालावं.

४. हे मिश्रण खरपूस भाजाव.

समोश्याचं आवरण बनवण्यासाठी-

१. ब्रेडच्या बाजूला असलेल्या जाड कडा सुरीने कापा.

२. ब्रेडचा मऊ असलेला मध्यभाग लाटा. तो भाग लाटून सपाट झाला की मधून सुरीने कापून त्याचे दोन भाग करा. या झाल्या तुमच्या समोश्यांच्या पात्या तयार.

३. समोस्याचे मिश्रण पात्यांमध्ये घालून त्याला तीन बाजूंनी त्याच्या कडा बंद करा आणि समोसाचा आकार द्या.

४. मिश्रण पात्यातून बाहेर येऊ नये यासाठी तांदळाच्या पिठात पाणी टाकून त्याची पेस्ट करा आणि पात्यांचे तोंड बंद करण्यापूर्वी त्याच्या कडांना लावा.

५. तयार समोस्यांवर तेल/ तूप लावा आणि सामोसे १० मिनीटे बेक करा.

Cover Image Source: HK

Input your search keywords and press Enter.