लग्न मुहूर्त जवळ आले रे आले दुकानं गर्दीने भरू लागतात. साड्यांची, वस्तूंची, इतर कपड्यांची,दागिने या सगळ्याची खरेदी सुरु होते. लग्न घटिकेचा कार्यक्रम एका सणापेक्षा जास्त उत्साहात साजरा करतात. पण या सणासाठीची बचत अगदी वर्षांनुवर्षे केली जाते. इथे सांगितलेल्या काही युक्ती वापरून तुम्ही तुमची लग्न घटिका आर्थिकरित्या व्यवस्थित योजू शकाल.
१. लवकर सुरुवात करा-
रोम एका दिवसात बनवला गेला नव्हता, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. म्हणजेच बचतीला लवकरात लवकर सुरुवात कराल तर तुम्हालाच मदत होईल. तुमच्या पहिल्या पगारापासून थोडी थोडी बचत सुरु केलीत तर ४ ते ५ वर्षांत बरेच पैसे जमा होतील.
२.दुसरे बचत फंड वापरू नका-
जर तुम्ही अजून कोणते बचत फंड केले असतील तर ते मोडू नका. लक्षात ठेवा ते फंड तुम्ही वेगळ्या कारणांकरिता नियोजित केले आहेत.
३. खरेदीत भाव करा-
हे काही वेगळं सांगायला नको, तरीही जिथे होत असेल तिथे भाव करून पाहा. दागिन्यांवर लागेल तितकाच खर्च करा. लग्नास जवळच्या माणसांनाच आमंत्रण द्या. कदाचित वाचवलेल्या पैश्यात तुम्ही नवं घर घेऊ शकाल.