Now Reading:
वडा, समोसापासून ऑक्सफर्ड डिक्शनरीत असलेले हे मराठी शब्द माहितीयेत?
वडा, समोसापासून ऑक्सफर्ड डिक्शनरीत असलेले हे मराठी शब्द माहितीयेत?

आपल्याला इंग्रजी वाचताना एखादा शब्द अडला तर आपण त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी लगेच शब्दकोशाचा म्हणजेच डिक्शनरीचा आधार घेतो. आजच्या घडीला बाजारात अनेक डिक्शनरी उपलब्ध आहेत पण, त्यातही अनेकांचा कल प्रसिद्ध आणि नावाजलेल्या अशा Oxford Dictionary कडे असतो. पण तुम्हाला माहितीये का, या डिक्शनरीमध्ये हळूहळू आपल्या मराठी भाषेतील शब्ददेखील जोडण्यास सुरुवात झाली आहे.

डिक्शनरीमध्ये वर्षांतून तीन वेळा नवीन शब्द जोडण्याची पद्धत.

ऑक्सफर्ड इंग्लिश (Oxford English) डिक्शनरीमध्ये वर्षांतून तीन वेळा नवीन शब्द जोडण्याची पद्धत आहे. आधुनिक जीवनशैली आणि चालू घडामोडी पाहता प्रत्येक तिमाहीत काही नवे शब्द डिक्शनरीमध्ये समाविष्ट केले जातात.  आज मराठी भाषा दिनाच्या औचित्यावर ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले काही मराठी शब्द आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चणा आणि चणाडाळ शब्दांचा समावेश

गेल्याचवर्षी जून महिन्यामध्ये ऑक्सफर्डच्या शब्दकोशात चणा आणि चणाडाळ या शब्दांचा समावेश करण्यात आला.  

हे झाले मराठी शब्द पण त्याव्यतिरीक्त याआधी वडा आणि समोसा या खाद्यपदार्थांची नावे तसेच, सूर्य नमस्कार, अच्छा, भाजी, मैदान, बॉलिवूड यासारख्या शब्दांनाही शब्दकोशात स्थान देण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे इतरही काही ऐतिहासिक आणि रोजच्या वापरातील शब्द डिक्शनरीमध्ये आजवर समाविष्ट करण्यात आले आहेत.

१८४५ पासून आतापर्यंत अनेक शब्दांचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे.

Input your search keywords and press Enter.