Now Reading:
पाकिस्तानमधील ‘नारायण जगन्नाथ विद्यामंदिर’ शाळा!
पाकिस्तानमधील ‘नारायण जगन्नाथ विद्यामंदिर’ शाळा!

मराठी भाषा जगातील प्रमुख भाषांपैकी एक समजली जाते. जगात कोटीच्या संख्येने लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेच्या सुवर्ण इतिहासाबद्दल काही वेगळं सांगायला नको. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्या बद्दल बहुतेकांना माहित नसेल.

पाकिस्तानमधील कराची शहरात एका मराठी माणसाने उभारलेली शाळा आहे आणि या शाळेचं नाव देखील मराठी माणसाचे आहे ते म्हणजे- नारायण जगन्नाथ विद्यामंदिर. ऐकून चकित झालात ना? भारताप्रमाणेच पाकिस्तानात सुद्धा मराठी भाषेचा सन्मान केला जातोय हे पाहून आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटतो. यानिमित्ताने येणाऱ्या पिढीने मराठी भाषा शिकावी आणि या भाषेला मान द्यावा हीच इच्छा.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून कराचीमध्ये मराठी लोकांची संख्या लक्षणीय होती. पूर्वी कराची ही सिंध प्रांताची राजधानी होती. त्यावेळी मराठी लोकांच्या पुढाकारातून तेथे एक शाळा उभारण्यात आली. मुंबईचे नारायण जगन्नाथ वैद्य यांना या शाळेत शिकवण्यासाठी बोलवण्यात आले. त्यांच्या नावावरूनच या शाळेचे नाव ठेवण्यात आले. फाळणीपूर्वी या शाळेत बहुतांश मराठी मुलं शिकायला जात होती. तसेच, तेथे मराठी विषयही शिकवला जात होता. कराचीमधील प्रमुख शाळांपैकी ही एक आहे.

दरम्यान, जगातील प्रमुख दहा भाषांमध्ये अद्याप मराठीचा समावेश करण्यात आलेला नाही. हिंदी आणि उर्दू भाषेपेक्षा प्राचीन असलेली मराठी भाषा अजूनही या दहा भाषांमध्ये नाही. केंद्र सरकार याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे म्हटले जातेय.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.