Now Reading:
मराठी चित्रपटांचे नवे व्हर्जन
मराठी चित्रपटांचे नवे व्हर्जन

भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या दुसऱ्या भाषेतील चित्रपटाचा रिमेक करण्याची एक नवी प्रथा गेल्या काही वर्षात आली आहे. आता बॉलिवूडमध्ये येणारा एखादा तरी चित्रपट हा इतर भाषेतील चित्रपटाचा किंवा हॉलिवूडचा रिमेक असतो. मराठी भाषेतही आता रिमेकचा ट्रेण्ड येऊ लागला आहे. पूर्ण चित्रपट नसला तरी काही संकल्पना या इतर भाषेतल्या चित्रपटातून घेतल्या जातात. केवळ इंग्रजी नव्हे तर मराठी भाषेतील अनेक चित्रपट हिंदी आणि इतर भाषेत बनविण्यात आले आहे. पाहुयात कोणते आहे ते मराठी चित्रपट-

१) अशी ही बनवाबनवी = ‘Paying Guest’

गेली २५ वर्षे मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या चित्रपटातील सगळी पात्रे आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’चा २००९ साली हिंदीमध्ये मध्ये ‘पेंईग गेस्ट’ म्हणून चित्रपट आला होता. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही.

२) फेकाफेकी = ‘Golmaal’

‘फेकाफेकी’ या विनोदी चित्रपटावर दिग्दर्शक रोहित शेट्टीची हिंदीतील ‘गोलमाल’ सीरिज आधारित आहे.

३) बिनधास्त = ‘Bhagam Bhag’

दोन तरुणींच्या आयुष्यातील थरारावर हा चित्रपट होता. या चित्रपटाची संकल्पना घेऊन २००६ साली ‘भागमभाग’ हा चित्रपट आला. यात अक्षय कुमार आणि गोविंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

४) डोंबिवली फास्ट = ‘Evano Oruvan’

निशिकांत कामत दिग्दर्शित ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटाने मराठी माणसाचा संघर्ष प्रेक्षकांपुढे मांडला होता. संदीप कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा रिमेक तामिळ भाषेत ‘इव्होना ओरवाना’ नावाने आला. अभिनेता आर माधवनने यात प्रमुख भूमिका साकारली होती.

५) सैराट = ‘Dhadak’

मराठीतील सगळ्यात लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. केवळ मराठी माणसानेच नव्हे तर अख्ख्या भारतीय सिनेसृष्टीने या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. १०० कोटींच्या जवळ कमाई करणाहा हा मराठी भाषेतील पहिला चित्रपट. या चित्रपटाचा ‘मनसू मलिंगे’ हा कन्नड रिमेक करण्यात आला होता.

Input your search keywords and press Enter.