Now Reading:
मैत्रिणीच्या मदतीस धावून जाणारी झाली पहिली महिला गुप्तहेर; आजवर सोडवल्या ७५००० केस
मैत्रिणीच्या मदतीस धावून जाणारी झाली पहिली महिला गुप्तहेर; आजवर सोडवल्या ७५००० केस

झी मराठीवर काही काळापूर्वी ‘अस्मिता’ या नावाने एका स्त्री खासगी गुप्तहेरावर मालिका होती. पण महाराष्ट्रात एक अशीच अस्मिता आहे जिने अनेक प्रकरणांसाठी गुप्तहेर म्हणून काम केलं आहे. या पहिल्या महिला गुप्तहेराचे नाव रजनी पंडित. यांना महिला ‘शेरलॉक होल्मस’ या नावाने देखील ओळखले जाते.’

गेली तीन दशके त्या खासगी गुप्तहेर म्हणून कार्यरत आहेत. भारतात महिला खासगी गुप्तहेर म्हणून काम करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी गुप्तहेर होण्याचे बाळकडू आपल्या वडिलांकडून म्हणजे शांताराम पंडित यांच्याकडून घेतले. त्यांचे वडील मुंबई पोलिसांसाठी खासगी गुप्तहेर म्हणून काम करत होते.

रजनी यांनी महाविद्यालयात असतानाच गुप्तहेर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली वर्ग मैत्रिण संकंटात असल्यामुळे तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि तिला सर्व अडचणींतून बाहेर काढण्यास मदत केली.

एक खासगी गुप्तहेर म्हणून काम करताना काही वेळेस गोष्टी अंगाशी येऊ शकतात. किंवा पोलिसांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा व्यवसाय एकदम जिकरीचा आहे. त्यात कोणत्याही प्रकारची निष्काळजी तुम्हाला अडचणीत टाकू शकते. २००७ पासून खासगी गुप्तहेर कायदा संसदेत सादर करण्यात आला आहे. पण त्यावर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही.

आज भारतामध्ये अनेक गुप्तहेर संघटना आहेत. पण त्यावर कायदेशीर नियंत्रण ठेवण्याचीदेखील गरज आहे.

Cover Image Source

Input your search keywords and press Enter.