Now Reading:
तुमच्या व तुमच्या मुलीच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक असलेले ३ स्त्री रक्षक कायदे
तुमच्या व तुमच्या मुलीच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक असलेले ३ स्त्री रक्षक कायदे
father daughter

भारतात एकीकडे स्त्रियांना देवीसमान मानले जाते, त्यांच्या सक्षमीकरणासाठी मोहिमा आखल्या जातायेत सिनेमे बनतायत तर दुसरीकडे अजूनही महिलांवर हिंसक अत्याचार होत आहेत. भारतातील अंदाजे ३७टक्के महिला कधीनाकधी शारीरिक किंवा लैंगिक शोषणाला बळी पडल्यात. भारतीय योजना आयोगाच्या २०१५ च्या अहवालानुसार ८४टक्के महिला आपल्या घरातच किमान एकदा घरगुती हिंसेला बळी पडतात. हे थांबेल तेव्हा थांबेल. पण, त्यापूर्वी कायदेशीररित्या तुम्ही या भेसूर अवस्थेला कसं तोंड देऊ शकता, हे जाणून घेऊ-

भारतीय दंडसंहिता सुधारणा १९८३-

domestic violence

१९८३ मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये विवाहित महिलांसाठी विशेष प्रयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विवाहित महिलांवर त्यांच्या पतीकडून किंवा त्यांच्या परिवाराकडून होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध कायदा आखला आहे. यामध्ये महिलेच्यावतीने तिचे परिवारजनही तक्रार नोंदवू शकतात.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५-

नावाप्रमाणेच या अधिनियमात महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणाची तरतूद केलेली आहे. यात हिंसाचाराची सुस्पष्ट व्याख्या आहे. तसेच यात महिलांना सासरी राहण्याचा अधिकार, तसेच घरातून बाहेर पडावे लागल्यास आर्थिक भरपाईचीसुद्धा तरतूद यामध्ये आहे.

२०१३ दंडसंहिता सुधारणा-

domestic violence

जस्टीस वर्मा कमिटीच्या अहवालानंतर बलात्कारावर कठोर कारवाई करण्याची तरतूद दंडसंहितेमध्ये करण्यात आली. यानुसार विनासंमती संभोग किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तूच्या सहाय्याने केलेला लैंगिक अतिप्रसंग,आदींवर केल्या जाणाऱ्या कारवाईचे प्रमाण अधिक कठोर आणि जलद गतीने करण्याची तरतूद केली आहे.


नव्याने समाविष्ट केलेले गुन्हे-

  • अॅसिड हल्ला
  • पाठलाग करणे
  • वाईट किंवा असभ्य हेतूने जासूसी करणे
  • जबरदस्तीने कपडे उतरवणे

Input your search keywords and press Enter.