Now Reading:
कराडमधील ही महिला पोलीस अधिकारी ड्युटी सांभाळून रचतेय मॅरेथॉन जगात विक्रम
कराडमधील ही महिला पोलीस अधिकारी ड्युटी सांभाळून रचतेय मॅरेथॉन जगात विक्रम

वडिलांमध्ये असेल्या खेळाच्या वेडातून शोभा देसाई या कराडमधील मुलीला अगदी लहान वयातच खेळांबद्दल गोडी निर्माण झाली. त्यानंतर सुरु झाला एक विलक्षण प्रवास! पोलीस अधिकारी, एका बारा वर्षांच्या मुलाची आई आणि मॅरेथॉन चॅम्पियन! आहे की नाही प्रेरणादायी? मग जाणून घेऊ हा पल्ला त्यांनी कसा गाठला ते-

कामटेंची पारखी नजर-

२००८ च्या हल्ल्यामधील शहीद एसीपी अशोक कामटे यांनी प्रथम शोभाच्या धावण्याच्या कुशलतेस हेरलं. त्यांच्या बोलण्यास मनावर घेऊन शोभा १९९५ मध्ये पोलिसात भरती झाल्या.

शालेय दिवसांपासूनच शोभा खेळामध्ये अव्वल होत्या. जिल्हा ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर एकूण ८५ हून अधिक स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. त्यांच्या नावे २१ किमी व ४२ किमी धावण्याचे मॅरेथॉनचे बरेच विक्रम आहेत.

५ वर्षांचा ब्रेक-

२००३ मध्ये गर्भधारणेच्या काळात त्यांचा सराव थांबला. त्या आई झाल्या. सरावास डॉक्टरांकडून मनाई होती. त्यांच्या मते त्या आळशी होत चाललेल्या, वजन वाढत होतं. त्यांना ट्रॅकच्या बाहेर राहणं जमत नव्हतं. शेवटी तब्बल ५ वर्षांनी त्या पुन्हा धावण्याकडे वळल्या.

 

डिपार्टमेंटकडून मदत-

त्यांचे कामाचे तास सरावाला साजेसे असे राखण्यात आले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांना प्रथम सरावाला पाठवत मग ड्युटीवर. खरंतर जेव्हा त्या सिंगापूर मास्टर्स अॅथलेटिक चॅम्पिअनशिपमधून पैशाच्या अभावातून माघार घेत होत्या तेव्हा ठाण्याचे पोलीस आयुक्त परम बीर सिंग त्यांच्या मदतीस धावून आले.

२०१७च्या स्टॅंडर्ड चार्टर्ड अर्ध मॅरेथॉनचं जेतेपद त्यांनी मिळवलं आणि आता त्या स्वतःचा विक्रम मोडायच्या हेतूने पुन्हा मैदानात उतरल्यात.

Input your search keywords and press Enter.