Now Reading:
संकंटांवर मात करुन मुलांना शिक्षण देणाऱ्या कोल्हापूरच्या शकुबाई कबुरे
संकंटांवर मात करुन मुलांना शिक्षण देणाऱ्या कोल्हापूरच्या शकुबाई कबुरे

कोल्हापूरच्या ६० वर्षीय शकुबाई कबुरे म्हणतात,” तुमचं मूळ कधीचं विसरू नका आणि तुमचं काम करत राहा, परिस्थिती किती ही वाईट असली तरी“.

कोल्हापूरच्या लाटवाडी गावात राहणाऱ्या शकुबाई कबुरे या ४० वर्षांपासून शेतमजुरी करत आहेत. पण त्यांनी स्वतःच्या मुलांना शिक्षण मिळवून देण्याचं आणि त्यांना स्वतःच्या पायवर उभं करण्याचं स्वप्न पूर्ण केलं. बालपणीचं वडिलांनी सोडलं आणि शकुबाई यांच्या आयुष्यातील अडचणी सुरु झाल्या. अनेक वर्षं ते रोजगार मिळवण्यासाठी २० किमी बसचा प्रवास करायचे, दिवसाला ६ तास काम करून ८० रुपये कमवायचे.

शकुबाई यांच्या पतीचा २००१ मध्ये अती मद्यपानामुळे निधन झालं. त्यानंतर दोन्ही मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. सगळ्या संकटांवर मात करून या महिलेने त्यांच्या दोन्ही मुलांचं आयुष्य मार्गी लावलं. त्यांचा २६ वर्षीय धाकटा मुलगा ‘सिद्दप्पा कबुरे’ सध्या सीमा सुरक्षा दलात प्रशिक्षण घेत आहे. शकूबाईंचं स्वप्न होतं की, त्यांच्या मुलाने पोलीस दलात भरती व्हावं. पण त्यांनी मुलाला त्याचं स्वप्न जोपासू दिलं. त्यांचा ३२ वर्षीय मुलगा, संतोष एक शेतकरी असून, १.५ एकर जमिनीवर शेती करतो.

शकुबाईंनी अनेक अडचणींचा सामना करत जिद्दीने जीवन जगलं. आज देखील त्या गावाच्या बाहेर रोजगारीचे काम करतात. १० तास काम करण्यासाठी त्यांना १६० रुपये मजुरी मिळते.. शकुबाईंच्या धैर्याला सलाम!

H/T and Cover Image Source: The Better India

Input your search keywords and press Enter.