Now Reading:
या आहेत २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
या आहेत २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

कल्पना करा की, तुमच्या एखाद्या मित्राचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला आहे. मग तो आपला वाढदिवस कसा साजरा करत असेल? हा प्रश्न पडल्यावर तुमचा नक्कीच गोंधळ उडत असेल ना. फेब्रुवारी महिना फक्त २८ किंवा २९ दिवसांचाच असतो. म्हणजे तीन वर्षे तो २८ दिवसांचा, तर चौथ्या वर्षी या महिन्यात २९ दिवस असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला आला तर त्याची पंचाईतच होते. कारण त्याला आपला वाढदिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागणार. यंदाच्या वर्षीही फेब्रुवारीत २८ दिवसच आहेत. त्यानिमित्ताने २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे जाणून घेऊयात.

२९ फेब्रुवारीला जन्मलेल्या तीन प्रसिद्ध भारतीय व्यक्ती

२९ फेब्रुवारीला वाढदिवस असलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे सांगायची तर भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी रणछोडजी देसाई, प्रसिद्ध नृत्यांगना रुक्मिणी देवी, माजी भारतीय हॉकीपटू अ‍ॅडम सिनक्लेर यांचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत तरी २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या या तीनच प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांची नोंद असल्याची माहिती मिळते.

२९ फेब्रुवारीला जन्मलेल्या व्यक्ती वाढदिवस कधी साजरा करतात?

यंदा लीप वर्ष नाही. आता दोन वर्षानी म्हणजे २०२० मध्ये येईल, पण २९ फेब्रुवारीला वाढदिवस येणा-यांना एक प्रकारे कमनशिबीच म्हणावे लागेल. कारण त्यांना तो साजरा करायची संधी तब्बल चार वर्षांनी मिळणार किंवा तो आदल्या दिवशी किंवा दुस-या दिवशी करावा लागणार आणि त्यांचे वय कसे मोजायचे, हाही प्रश्नच राहणार?

तुम्हाला माहित असलेल्या २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या व्यक्तीचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.

Input your search keywords and press Enter.