Now Reading:
स्मार्टफोनला नव्यासारखे ठेवण्याचे सोपे उपाय
स्मार्टफोनला नव्यासारखे ठेवण्याचे सोपे उपाय

आपण अगदी आवडीने आपल्याला हवा तो स्मार्टफोन खरेदी करतो. पण काही महिने झाल्यानंतर आपल्याला तोच फोन जुना वाटू लागतो. कधीकधी तर मोबाइल हँग होणे किंवा मध्येच काम करणंही बंद करतो. नवीन स्मार्टफोन विकत घेतल्यावर तो ज्या वेगाने आणि अचूकपणे काम करतो त्याच वेगाने आणि अचूकतेने जर तुमचा स्मार्टफोन एक वर्षानंतरही काम करत असेल तर तुम्हाला नशीबवान समजलं जाईल. कारण आजकाल सगळेच स्मार्टफोन काही काळानंतर निकामी होऊ लागतात. परंतु काही उपाय आहेत जे तुमच्या स्मार्टफोनला जवळजवळ तितकच चांगल आणि अचूक राहण्यासाठी उपयोगी पडू शकतात. जेणेकरून, तुम्हाला तुमचा फोन अगदी सुरुवातीला घेतल्याप्रमाणेच वाटेल. येथे,आम्ही तुमच्यासाठी या समस्येवर तोडग्यांची यादी दिली आहे.

स्मार्टफोन केस कव्हर आणि स्क्रीन गार्ड खरेदी करा

तुम्ही वापरात असलेल्या स्मार्टफोनला विकत घेऊन महिने झाले असो किंवा काही दिवस, स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी केस कव्हर आणि स्क्रीन गार्ड वापरणे गरजेचे आहे. कारण हातातून कधीही फोन निसटून पडण्याची शक्यता असते.

होमस्क्रीनवर गरजेपुरते अॅप्स ठेवा

घर असो, कपड्यांचं कपाट असो, लॅपटॉप स्क्रीन असो किंवा स्मार्टफोन निरुपयोगी गोष्टी ठेवल्यात तर ते खराबच दिसणार. त्यामुळे होमस्क्रीनवर केवळ गरजेचे अॅप्स ठेवा. यामुळे फोनची स्क्रिन सुंदर तर दिसेलच त्याचसोबत बॅटरी लाइफसुद्धा वाढेल.

अॅण्टी वायरस

जश्याप्रकारे घर स्वच्छ ठेवण्यासाठी साफ सफाई करणं गरजेचं असत त्याच प्रकारे फोनच मशीन साफ ठेवण्यासाठी अॅण्टी वायरस महत्वाचे असतात. गुगल प्ले स्टोरमधून तुमच्या स्मार्टफोनसाठी सुयोग्य असा अॅण्टी वायरस डाउनलोड करा.

स्मार्टफोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

स्मार्टफोन वापरताना प्रथम, एका वेळी अनेक अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू ठेऊ नये. झोपण्याच्या आधी किंवा इतर काम करत असताना वाय-फायच बटन बंद ठेवावं. याने बॅटरी अधिक वेळ चार्ज राहते. दुसरी गोष्ट म्हणजे वॉलपेपरवर लाइव्ह म्हणजेच हलत चित्र ठेऊ नये याने सुद्धा बॅटरी लवकर कमी होते.

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.