Now Reading:
आता फ्रिजविना करा ३० दिवस भाज्यांची साठवण; भारतीय संशोधकांची कमाल
आता फ्रिजविना करा ३० दिवस भाज्यांची साठवण; भारतीय संशोधकांची कमाल

किती मस्त झालं असतं ना जर फ्रिजशिवाय भाज्या ताज्या राहिल्या असत्या. म्हणजे फ्रिजमध्ये विनाकारण गर्दीसुद्धा नाही आणि बाजारातून आणून ठेवलेल्या भाज्याही खराब होणार नाही. थोडं स्वप्नाळू असल्यागत वाटतंय ना? पण हे स्वप्न सत्यात उतरवलंय दोन भारतीय संशोधकांनी, चकित झालात ना?

आयआयटीयन्सची कमाल

आयआयटी हैद्राबादच्या मटेरियल सायन्स व मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. शिवकल्याणी अडेपू आणि डॉ. मुद्रिका खंडेलवाल यांनी असं पॅकेजिंग मटेरियल तयार केलंय ज्यात भाज्या फ्रिजशिवाय महिनाभर फ्रेश राहू शकतात.

विज्ञानाची जादू

त्यांनी बॅक्टेरियल सेल्युलोजची सिल्वर नॅनोपार्टिकल्स प्रक्रिया केली. बॅक्टेरियल सेल्युलोजमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. तसेच सिल्वर नॅनोपार्टिकल्स मायक्रोबायल प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात.

भाज्या ताज्या राहण्यासाठी हवा व आर्द्रतेची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. बॅक्टेरियल सेल्युलोजमध्ये पाण्याचे प्रमाण नियंत्रित केल्यास ही देवाणघेवाण सुरळीत होते.

प्रयोग

यासाठी टोमॅटोवर प्रयोग करण्यात आले. टोमॅटो पॉलिथीन, पॉलिप्रॉपिलीन आणि आता नव्याने तयार केलेल्या या आधुनिक पॅकेजिंग मटेरियलमध्ये बांधून ठेवण्यात आले. निरिक्षणानंतर असे आढळून आले की, आधुनिक पॅकेजिंग मटेरियलमध्ये ठेवलेले टोमॅटो ३० दिवस ताजे होते. तर, पॉलिथिन आणि पॉलिप्रॉपिलीनमध्ये ठेवलेले टोमॅटो पंधरा दिवसांच्या आतच टोमॅटो कुसले.

देशभरातून प्रशंसा

भारताच्या उपराष्ट्रपतींनीसुद्धा त्यांची ट्विटरमार्फत प्रशंसा केली. या संशोधनातून बऱ्याच क्षेत्रांसाठी मार्ग खुले करण्यात आलेत. हेच गुणधर्म औषधे, सॅनिटरी नॅपकीन तसेच हॉस्पिटलच्या चादरींसाठी वापरता येतील.

News Source: The Better India

Cover Image Source: Shutterstock

Input your search keywords and press Enter.